अलीकडेच भारतीय टेलीकॉम विश्वामध्ये मोठी खळबळ सुरु होती. कारण भारतातील तिन्ही आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या म्हणजेच Jio, Airtel आणि VI ने आपल्या प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली आहे. ही दरवाढ बुधवार 3 जुलै पासून लागू करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना महागाईचा मोठा फटका नक्कीच बसला आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio ने केवळ दरवाढच नाही तर त्यासोबत काही लोकप्रिय प्लॅन्स गपचूपणे रिमूव्ह देखील केले आहेत. जाणून घेऊयात Jio ने कोणते प्लॅन्स पोर्टफोलिओमधून हटवले.
सर्व प्रथम सर्वात लोकप्रिय प्लॅनच्या यादीत समाविष्ट असलेला 2545 रुपयांचा प्लॅन हटविण्यात आला आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह ऑफर केला जात होता. यामध्ये युएजर्सना दररोज 1.5 GB डेटा प्रदान केला जात होता.
Jio च्या वार्षिक प्लॅनमध्ये 2,999 रुपयांच्या प्लॅन हा सर्वोत्तम आणि लोकप्रिय प्लॅन होता. हा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह 2 GB दैनिक डेटासह ऑफर केला जात होता. मात्र, Jio ने हा प्लॅन देखील रिमूव्ह केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता तुम्हाला 3,599 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. यामध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळेल.
Jio चा 1,599 रुपयांचा प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी विशेष होता, ज्यांना कमी किमतीत वर्षभर नंबर ॲक्टिव ठेवायचा आहे आणि जास्त डेटाची आवश्यकता नाही. लक्षात घ्या की, 1,559 रुपयांच्या प्लॅनऐवजी आता तुम्हाला 1,899 रुपयांचा रिचार्ज प्लॅन खरेदी करावा लागेल.
Jio ने OTT सबस्क्रिप्शन प्लॅनही मोठ्या प्रमाणात रिमूव्ह करत युजर्सना मोठा झटका दिला. या प्लॅनमध्ये 3,662 रुपयांचा प्लॅन, 3,226 रुपयांचा प्लॅन आणि 3,225 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. हे सर्व प्लॅन्स OTT सबस्क्रिप्शनसह ऑफर केले जात होते. या प्लॅन्सची वैधता वार्षिक म्हणजे 365 दिवसांची होती. अधिक माहितीसाठी तुम्ही Jio च्या अधिकृत साईटला भेट देऊ शकता.