Reliance Jio च्या ग्राहकांसाठी आता अत्यंत चिंताजनक बातमीची आहे. कारण Jio ने आपल्या पोर्टफोलिओमधून एक स्वस्त प्लॅन रिमूव्ह केला आहे. आता हा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. होय, कंपनीने ऑफरमधून 119 रुपयांचा प्लॅन काढून टाकला आहे. टेलिकॉम कंपनीने हा प्लॅन 2021 मध्ये टॅरिफ वाढवल्यानंतर सादर केला होता.
हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. ज्यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. पण आता ही योजना देशाच्या कोणत्याही भागात उपलब्ध नाही.
कंपनीने 119 रुपयांचा सर्वात वाजवी प्लॅन अधिक किमतीच्या प्लॅनसह बदलला आहे. आता रिलायन्स Jio चा नवीन सर्वात किफायतशीर आणि स्वस्त प्लॅन 149 रुपयांचा करण्यात आला आहे.
रिलायन्स Jioचा 149 रुपयांचा प्लॅन 20 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅन अंतर्गत यूजर्सना दररोज 1GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS दिले जात आहेत. याशिवाय, तुम्हाला JioCinema, JioCloud आणि JioTV चाही सपोर्ट मिळत आहे. लक्षात घ्या की, Jio चा हा प्लॅन 5G वेलकम ऑफरसाठी सक्षम नाही, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना खरोखर ट्रू 5G डेटा मिळतो.
कंपनीने अलीकडेच दोन नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये ग्राहकांना लोकप्रिय आणि प्रसिद्ध OTT प्लॅटफॉर्म Netflix चे सब्स्क्रिप्शन मोफत मिळेल.
या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 100SMS दिले जात आहेत. या प्रीपेड प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड 5G डेटा देखील उपलब्ध आहे. याशिवाय, रिचार्ज प्लॅन अमर्यादित कॉलिंग तसेच Netflix चे सबस्क्रिप्शन आणि Jio च्या प्रीमियम ऍप ऍक्सेससह येतो.
हा रिचार्ज प्लॅन देखील 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा डेटा पॅक अमर्यादित 5G डेटा तसेच 3GB डेटा आणि 100SMS दररोज ऑफर करतो. यासोबतच प्रीपेड प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.