टेलिकॉम विश्वात रिलायन्स Jio ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंपनीने अलीकडेच आपल्या सर्व रिचार्ज प्लॅन्स महाग केले आहेत. मात्र, दरवाढीच्या वेळी Jio ने आपल्या वापरकर्त्यांना काही प्रमाणात दिलासा देत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये 149 आणि 179 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्सचा समावेश केला होता. मात्र लक्षात घ्या की, हा दिलासा केवळ काही काळासाठी टिकवत कंपनीने हे दोन्ही रिचार्ज आपल्या साइट आणि Jio ॲपवरून शांतपणे रिमूव्ह केले.
Jio चे 149 आणि 179 रुपयांचे स्वस्त प्लॅन्स रिमूव्ह केल्यावर Jio सिम सक्रिय ठेवणे पूर्वीपेक्षा महाग झाले आहे. कारण, आता रिलायन्स Jio चा सर्वात स्वस्त वैधता रिचार्ज प्लॅन 189 रुपयांचा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनमध्ये यूजर्सना 2GB मोबाईल डेटा, अमर्यादित कॉलिंग, 300 SMS आणि Jio ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. हा प्लॅन जवळपास एक महिन्याच्या वैधतेसह म्हणजेच 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे.
Jio ने स्वस्त 149 रुपयांचा प्लॅन आपल्या पोर्टफोलिओमधून रिमूव्ह केला आहे. या प्रीपेड रिचार्जमध्ये, 14 दिवसांसाठी एकूण 14GB डेटा उपलब्ध होता. म्हणजेच तुम्हाला दररोज 1GB इंटरनेट डेटा ऑफर करण्यात आला होता. या प्लॅनसह Jio ने कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा मिळत होती.
Jio च्या 1GB दैनंदिन डेटा प्लॅनसाठी दुसरा पर्याय म्हणजे 179 रुपयांचा प्लॅन होता. या प्लॅनमध्ये तुम्हाला 18 दिवसांची वैधता मिळत होती. उपलब्ध बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात दररोज 1GB डेटाचा लाभ मिळत आहे. म्हणजे तुम्हाला 18 दिवसात एकूण 18GB डेटा मिळत असे. यासोबतच. अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ही दिले जात आहेत. एवढेच नाही तर, या प्लॅनसह तुम्हाला मोफत Jio ॲप बेनिफिट्सदेखील मिळत होते.