JIO कडे युजर्ससाठी 100 रुपयांच्या अंतर्गत येणारे बरेच प्लॅन्स आणि व्हाउचर्स आहेत. यामध्ये 61 रुपयांचा प्लॅन सध्या लोकप्रिय आहे. अलीकडेच म्हणजे दोन आठवड्यांआधी या प्लॅनमध्ये दिलेल्या डेटाची मर्यादा वाढवण्यात आली होती. यामध्ये तुम्हाला एकूण 10GB डेटाचा लाभ मिळत होता.
आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी या प्लॅनमध्ये यूजर्सना 6GB डेटा मिळत होता. हे मुळात डेटा व्हाउचर आहे, जे बेस प्रीपेड प्लॅनसह घेता येते. वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने शांतपणे या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा 6GB वरून 10GB पर्यंत वाढवला होता. मात्र, कंपनीने पुन्हा एकदा शांतपणे या डेटा व्हाउचरची मर्यादा 6GB केली आहे.
सध्या, 61 रुपयांचा प्लॅन 6GB डेटासह रिलायन्स JIO वेबसाइट आणि मोबाइल ऍपवर सूचीबद्ध झालेला आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये कोणतीही स्टँडअलोन वैधता मिळणार नाही. तुमच्या बेस प्लॅनच्या वैधतेइतकी या प्लॅनची वैधता असणार आहे.
दूरसंचार कंपनी आपल्या 5G कव्हरेजचा झपाट्याने विस्तार करत आहे. रिलायन्स JIO ने आतापर्यंत भारतातील सुमारे 5233 शहरे/नगरांमध्ये 5G सर्व्हिस सुरू केली आहे. तुमच्याकडे 5G फोन असल्यास आणि तुम्ही JIO च्या 5G क्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला या सेवेचा फायदा घेता येणार आहे.