गेल्या वर्षी म्हणजेच 2021मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवून ग्राहकांना झटका दिला होता. त्यानंतर ग्राहक बऱ्याच स्वस्तातल्या रिचार्ज योजना शोधत होते. त्याबोबरच, आता सतत वाढत्या महागाईमध्ये रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढतच चालल्या आहेत. भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jioने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एकाअहवालानुसार, कंपनीने JioPhone चे दर 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. अहवालानुसार, कंपनीचे 100 दशलक्षाहून अधिक JioPhone वापरकर्ते आहेत.
हे सुद्धा वाचा : Samsungचा उत्कृष्ट 4K स्मार्ट TV लाँच, खरेदीवर वर्षभरासाठी Amazon प्राइम व्हिडिओ आणि Hotstar मोफत
कंपनीने आता 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या 155 रुपयांच्या प्लॅनची किंमत 186 रुपये इतकी केली आहे. त्याबरोबरच, 28 दिवसांच्या वैधतेसह 185 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 222 रुपये करण्यात आली आहे, ज्यामध्ये दररोज 2 GB डेटा दिला जातो. त्याचप्रमाणे, 336 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 899 रुपये करण्यात आली आहे.
यापूर्वी, कंपनीने 749 रुपयांचा प्लॅन 150 रुपयांनी महाग केला होता. खरं तर, ग्राहक JioPhone खरेदी करण्यासाठी 1,999 रुपये, 1,499 रुपये आणि 749 रुपये यांसारखे पर्याय निवडू शकतात. दरम्यान, कंपनीने 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 899 रुपयांपर्यंत वाढवली आहे.
ही ऑफर त्या ग्राहकांना लागू होईल, जे JioPhone चे विद्यमान वापरकर्ते आहेत. जर तुम्हाला नवीन JioPhone घ्यायचा असेल, तर 899 रुपयांमध्ये नवीन Jio फोन तर मिळणारच, त्यासोबतच 1 वर्षाचा अमर्यादित प्लॅन देखील दिला जाईल. यामध्ये वर्षभर अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह एकूण 24 GB डेटा उपलब्ध आहे. यासोबतच Jio ऍप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील आहे.