रिलायन्स जिओने अतिशय शांतपणे दरवाढीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. कंपनीने आपल्या एका प्रीपेड प्लॅनची किंमत 150 रुपयांनी वाढवली आहे. आधी हा रिचार्ज प्लॅन 749 रुपयांचा होता, पण आता जिओ यूजर्सना हा प्लॅन घेण्यासाठी 899 रुपये खर्च करावे लागतील. जिओचा हा प्रीपेड प्लॅन अशा वापरकर्त्यांसाठी बनवण्यात आला आहे, ज्यांना कंपनीकडून दीर्घकालीन वैधता हवी आहे. चला तर जाणून घेऊयात या प्लॅनबद्दल सविस्तर तपशील…
रिलायंस Jio ही कंपनी देशातील सर्वात स्वस्त दर योजना ऑफर करण्यासाठी ओळखली जाते. मात्र, यावेळी Jio ने 749 रुपयांच्या प्लॅनची किंमत 899 रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच हा प्लॅन 150 रुपयांनी महाग झाला आहे. पण त्याबरोबर या प्लॅनच्या फायद्यांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, फक्त किंमत वाढली आहे.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! Amazon वर मोठ्या बचतीसह 'हे' ब्रँडेड साउंडबार उपलब्ध, बघा यादी
जिओच्या वेबसाइटवर याबाबत अपडेट दिसत आहे. हा प्लॅन JioPhone वापरकर्त्यांसाठी आहे आणि यामध्ये एकूण 24GB डेटा देण्यात आला आहे. वापरकर्त्यांना दर 28 दिवसांनी 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो, त्यानंतर स्पीड 64 Kbps पर्यंत घसरतो. रिलायन्स जिओच्या या प्रीपेड प्लॅनची एकूण वैधता 336 दिवसांची आहे. 28 दिवसांनुसार JioPhone वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 50 SMS देखील मिळतात. त्याचबरोबर प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, Jio या प्लॅनसह वापरकर्त्यांना JioCinema, JioSecurity, JioCloud आणि JioTV चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देते.
JioPhone वापरकर्ते जे 749 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करू इच्छितात, त्यांना आता त्यासाठी 899 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, Jio ने त्यांच्या इतर कोणत्याही प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही.