संपणार आहे जियो प्राइम मेंबरशिप ची वैधता, कंपनी कडून नवीन घोषणेची अपेक्षा
जियो प्राइम मेंबरशिप ची वैधता लवकरच संपणार आहे, 31 मार्च पर्यंत वैधता आहे.
रिलायंस जियो ने आपल्या किफायती आणि डाटा सेंट्रिक नेटवर्क ला लॉन्च करून भारतीय टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये हलचल निर्माण केली होती. लॉन्च नंतर सुरवातीच्या 6 महिन्यापर्यंत फ्री सर्विस दिल्यामुळे हा प्लान खुप लोकप्रिय ठरला आणि 6 महिन्यांनंतर जियो ने 99 रूपयांची प्राइम मेंबरशिप लॉन्च केली, ज्या अंतर्गत कमी किंमतीत एका वर्षाचा रिचार्ज आणि अतिरिक्त फायदे देण्यात आले होते.
जियो मेंबरशिप ची वैलिडिटी आता लवकरच संपणार आहे, 31 मार्च पर्यंत याची वैलिडिटी आहे. म्हणजे सब्सक्रिप्शन ची तारीख संपायला काहीच दिवस शिल्लक आहेत आणि त्यामुळे लोक जियो कडून नवीन घोषणेची अपेक्षा करत आहेत.
अजून पर्यंत याबाबतीत कोणतीही माहिती समोर आली नाही पण जियो आपल्या नव नव्या प्लान्स नी नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करते आणि त्यामुळेच सब्सक्रिप्शन संपण्याच्या आधी लोकांना याचीच अपेक्षा आहे. हे पण बोलले जात आहे की कंपनी प्राइम सब्सक्रिप्शन पूर्णपणे बंद करू शकते आणि फ्री सर्विस च्या रुपात सर्व ग्राहकांना भेट मिळण्याची शक्यता आहे.
इथे जाणून घ्या प्राइम मेंबरशिप अंतर्गत यूजर्सना काय मिळते :-
एका वर्षापर्यंत प्रति दिन 10 रुपयांच्या प्रभावी किंमतीत फ्री अनलिमिटेड डेटा आणि वॉईस सर्विस
अतिरिक्त डाटा आणि वैलिडिटी सह स्पेशल रिचार्ज प्लान्स
कोणत्याही नेटवर्क वर फ्री VoLTE वॉयस कॉल, त्याच बरोबर रोमिंग मध्ये पण
जियो अॅप्स साठी फ्री एक्सेस ची सुविधा
जियो ने आपल्या फ्री सर्विसला पेड सर्विस करण्या सोबत प्राइम मेंबरशिप ची सुरवात केली होती, कंपनी ने ही ऑफर एका लॉयल्टी प्रोग्राम बरोबरच सब्सक्राइबर्स टिकवून ठेवण्यासाठी सादर केली होती. प्राइम मेंबरशिप ला सुरवातीला कंपनी ने एका लिमिटेड ऑफर च्या रुपात सादर केले होते पण जास्तीत जास्त मेंबर बनवण्यासाठी कंपनी ने ही ऑफर चालू ठेवली. आता हे बघावे लागेल की 31 मार्च च्या आधी जियो या प्लानची वैलिडिटी वाढवून लोकांना आश्चर्यचकित करते कि नवीन किफायती प्लान सादर करते ते.