JIOच्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनमध्ये NETFLIX आणि PRIME VIDEO मोफत, पूर्ण बेनिफिट बघा

Updated on 18-Oct-2022
HIGHLIGHTS

NETFLIX आणि PRIME VIDEO मोफत असलेले JIOचे पोस्टपेड प्लॅन्स

या प्लॅनमध्ये एकूण 75 GB डेटा मिळेल.

या प्लॅन्सची सुरुवातीची किंमत एकूण 399 रुपये

रिलायन्स JIO युजर्सना उत्तम प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. प्रीपेड प्लॅन्स व्यतिरिक्त कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक मस्त पोस्टपेड प्लॅन्स आहेत. JIO चा 399 रुपयांचा प्लॅन यापैकी एक आहे. अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ऑफर करणार्‍या या प्लॅनमध्ये तुम्हाला NETFLIXच्या मोबाइल प्लॅनचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय कंपनी या प्लॅनमध्ये एक वर्षासाठी Amazon Prime Video चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.
 
हे सुद्धा वाचा : Infinix Note 12 (2023) स्मार्टफोन 50MP कॅमेरासह लाँच, तुमच्या बजेटमध्ये आहे किमंत

 या प्लॅनमध्ये कंपनी यूजर्सना इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 75 GB डेटा देत आहे. डेटा मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला 1 GB डेटासाठी 10 रुपये खर्च करावे लागतील. हा प्लॅन 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर बेनिफिटसह येतो.

JIO चा 599 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला NETFLIX आणि Amazon Prime Video चाही मोफत प्रवेश मिळेल. प्लॅनमध्ये इंटरनेट वापरासाठी एकूण 100 GB डेटा दिला जात आहे. कंपनीचा हा प्लॅन 1 अतिरिक्त सिम कार्डसह येतो. यामध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 मोफत SMS देखील मिळतील.

JIO चा 799 रुपयांचा प्लॅन

JIO चा हा कौटुंबिक पोस्टपेड प्लॅन 2 अतिरिक्त सिम कार्डांसह येतो. यामध्ये कंपनी एकूण 150 GB डेटा देत आहे. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदाही मिळतो. हा प्लॅन वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS चा लाभ देखील देतो. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Netflix मोबाईल प्लॅन आणि Amazon Prime Video ची मोफत सदस्यता समाविष्ट आहे.

JIO चा 999 रुपयांचा प्लॅन

JIO च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी एकूण 200 GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये 500 GB पर्यंत डेटा रोलओव्हरचा फायदाही मिळतो. प्लॅन 3 अतिरिक्त सिम कार्डसह येतो. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज 100 फ्री SMS ही दिले जात आहेत. बाकी प्लॅन्सप्रमाणे, यामध्ये देखील तुम्हाला NETFLIXच्या मोबाईल प्लॅन्ससह Amazon Prime Video चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :