JIO वापरकर्त्यांसाठी सर्वात खास प्लॅन्स, मोफत OTT बेनिफिट्ससह मिळतील अनेक फायदे

JIO वापरकर्त्यांसाठी सर्वात खास प्लॅन्स, मोफत OTT बेनिफिट्ससह मिळतील अनेक फायदे
HIGHLIGHTS

Jio च्या या प्लॅनमध्ये मोफत OTT फायदे उपलब्ध आहेत.

आज आम्ही अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला खूप फायदे देतात.

हे प्लॅन्स Netflix, Amazon Prime Video, Disney + Hotstar वर मोफत प्रवेश देतात.

JIO चे पोस्टपेड प्लॅन खूप खास आहेत पण त्यांची किंमत अगदी परवडणारी आहे. यासोबतच या प्लॅन्समध्ये मोठे फायदेही मिळतात. जर तुम्हाला कॉलिंगसोबत अनेक फायदे हवे असतील तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. आज आम्ही अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला खूप फायदे देतात.

हे सुद्धा वाचा : Poco X5 Pro 5G सेल आजपासून सुरू, तुम्हाला मिळेल 2 हजारांची सूट

JIO चा 399 रुपयांचा प्लॅन

  399 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये 75GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS चा लाभ मिळतो. प्लॅनसोबतच मोफत Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

JIO चा 599 रुपयांचा प्लॅन 

  या प्लॅनमध्ये 100GB इंटरनेट, 100 SMS प्रतिदिन, अमर्यादित कॉलिंग, Netflix चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन, Amazon Prime Video, Disney + Hotstar देखील उपलब्ध आहेत.

JIO चा 799 रुपयांचा प्लॅन 

799 रुपयांचा पुढील प्लॅन 150GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटासह येतो. दोन अतिरिक्त सिम कार्ड, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित SMS चा लाभ असलेला हा फॅमिली प्लॅन आहे. प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.

JIO चा 999 रुपयांचा प्लॅन 

JIO च्या या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. प्लॅनमध्ये 200GB हायस्पीड डेटा, 500GB रोलओव्हर डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि मोफत SMS सह तीन सिम कार्ड उपलब्ध आहेत. प्लॅनसोबतच मोफत Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे मोफत फायदे उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo