प्लॅनसह ग्राहकांना पहिल्या महिन्यासाठी फ्री ट्रायल
Jio True 5G वेलकम ऑफर देखील मिळेल.
रिलायन्स Jioने आपला नवीन पोस्टपेड फॅमिली प्लॅन Jio Plus लाँच केला आहे. या प्लॅनसह ग्राहकांना पहिल्या महिन्यासाठी फ्री ट्रायल देखील मिळेल. कंपनीने सांगितले की, जिओ प्लस प्लॅनमध्ये पहिल्या कनेक्शनसाठी ग्राहकाला 399 रुपये द्यावे लागतील, प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन देखील जोडले जाऊ शकतात. कंपनी नवीन प्लॅनसह Jio True 5G वेलकम ऑफर देखील देत आहे.
कंपनीने सांगितले की, Jio Plus प्लॅनमधील पहिल्या कनेक्शनसाठी ग्राहकाला 399 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनमध्ये 3 अतिरिक्त कनेक्शन जोडले जाऊ शकतात. मात्र लक्षात घ्या की, प्रत्येक अतिरिक्त कनेक्शनसाठी वापरकर्त्यांना 99 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच, तुम्ही Jio Plus मध्ये 4 कनेक्शन घेतल्यास, तुम्हाला दरमहा 696 रुपये द्यावे लागतील.
4 कनेक्शन असलेल्या फॅमिली प्लॅनमध्ये एका सिमची किंमत सरासरी 174 रुपये प्रति महिना असेल. पहिल्या महिन्याची विनामूल्य चाचणी देखील प्लॅनसह उपलब्ध आहे. एक महिन्याच्या मोफत चाचणीनंतरही जर एखादा वापरकर्ता सेवेबाबत समाधानी नसेल, तर तो त्याचे कनेक्शन रद्द करू शकतो, असे कंपनीने म्हटले आहे.
Jio True 5G वेलकम ऑफर
रिलायन्स Jio च्या नवीन फॅमिली प्लॅनसह अनेक ऑफर देखील उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये Jio True 5G वेलकम ऑफरसह अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे. संपूर्ण कुटुंब ही सेवा वापरू शकतात. सर्व सदस्यांना अमर्यादित 5G डेटा मिळेल. तसेच, प्लॅनमध्ये डेटाची कोणतीही दैनिक मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.