Disney + Hotstar सब्स्क्रिप्शनसह येणारे सर्व प्रीपेड प्लॅन्स jioकडून बंद
कंपनीने ऑक्टोबरपासून असे प्लॅन्स बंद करण्यात सुरुवात केली.
मात्र, JIO पोस्टपेड युजर्ससाठी अजूनही पर्याय उपलब्ध
रिलायंस JIOच्या ग्राहकांसाठी एक वाईट बातमी आहे. ज्या प्लॅन्ससह Disney + Hotstar सब्स्क्रिप्शन मोफत मिळत होते. ते प्लॅन्स कंपनीकडून बंद करण्यात आले आहेत. म्हणजेच, एकूण ज्या प्लॅन्समध्ये हॉटस्टारचे मोफत सब्स्क्रिप्शन होते, ते सर्व प्रीपेड प्लॅन्स बंद झाले आहेत. कंपनीने ऑक्टोबरपासून असे प्लॅन्स बंद करण्यात सुरुवात केली होती. त्यानंतर आता हे प्लॅन्स बंद झाले आहेत.
कंपनीने गेल्या महिन्यातच 499 रूपये आणि 601 रुपयांचे प्लॅन्स बंद केले होते. याशिवाय, कंपनीने आता वेबसाईटवरून रु. 1,499 आणि रु. 4,199 किमतीचे प्लॅन्सदेखील हटविले आहेत. या प्लॅन्ससह Disney + Hotstarचे सब्स्क्रिप्शन मिळत होते. मात्र, यावेळी कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही तर शांतपणे हे प्लॅन्स वेबसाइटवरून हटविले आहेत.
पोस्टपेड युजर्ससाठी पर्याय उपलब्ध
जर तुमच्याकडे JIOचे पोस्टपेड सिम आहे, तर नवीन बदलाची चिंता करू नका. जिओच्या पोस्टपेड सबस्कायबर्सना 399 रुपयांपासून सुरु होणाऱ्या मंथली प्लॅन्ससोबत Netflix, Amazon Prime आणि Disney + Hotstar चे सब्स्क्रिप्शन आताही दिले जात आहे. तुम्हाला मोफत OTT सब्स्क्रिप्शन्सचा लाभ हवा असल्यास तुम्ही आपले सिम प्रीपेडवरून पोस्टपेड करू शकता. मात्र, जिओकडून हे नवीन बदल का होत आहेत, याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही.
अन्य कंपन्याकडे OTT सब्स्क्रिप्शन मिळेल.
जिओशी स्पर्धा असणाऱ्या अन्य टेलीकॉम कंपन्यांजवळ OTT सब्स्क्रिप्शनसह येणारे प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये, Disney + Hotstar चे देखील समावेश आहे. जर तुम्ही ड्युअल सिम फोन वापरत असाल तर, OTT सब्स्क्रिप्शनसाठी AIRTEL किंवा VIचे सिम घेऊ शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.