digit zero1 awards

Netflix Subscription Free: ‘या’ स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत मिळतोय लोकप्रिय OTT सब्स्क्रिप्शन, बिनधास्त बघा तुमचे आवडते शोज

Netflix Subscription Free: ‘या’ स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मोफत मिळतोय लोकप्रिय OTT सब्स्क्रिप्शन, बिनधास्त बघा तुमचे आवडते शोज
HIGHLIGHTS

लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकता?

Jio च्या खास तीन लोकप्रिय प्लॅन्समध्ये तुम्हाला नेटफ्लिक्सचे सब्स्क्रिप्शन मोफत मिळेल.

प्रत्यक्षात Netflix चा एक महिन्याचा स्टँडर्ड प्लॅन 499 रुपयांना उपलब्ध आहे.

जर तुम्ही Netflix चे फ्री सब्सक्रिप्शन एंजॉय करू इच्छित असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. होय, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकता? याबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्हाला नेटफ्लिक्सचे सदर प्लॅन्स महाग वाटत असतील तर, ते टाळण्यासाठी तुम्ही काही रिचार्ज प्लॅनचे रिचार्ज करून मोफत सबस्क्रिप्शनचा मनसोक्त लाभ घेऊ शकता.

Jio चा 399 रुपयांचा प्लॅन

Jio चा हा रेंटल प्लॅन 75GB डेटा ऑफर करतो. याशिवाय अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS सह 10 रुपये प्रति GB शुल्क आकारले जाते. या प्लॅनमधील उपलब्ध OTT फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात Netflix चा मोबाइल प्लॅन आणि Amazon Prime मेंबरशिप समाविष्ट आहे.

jio annual plan

Jio चा 599 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 100GB डेटा ऑफर करण्यात आला आहे. यात तुम्हाला 10 रुपये प्रति GB, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, 100 SMS दररोज मिळतात. मोफत OTT सबस्क्रिप्शन बंडलमध्ये, तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

Jio चा 999 रुपयांचा प्लॅन

Netflix subscription jio plans
Netflix subscription jio plans

या प्लॅनमध्ये तुम्हाला 200GB डेटा मिळतो. त्यानंतर फॅमिली प्लॅन अंतर्गत तीन Jio सिमवर 10 रुपये प्रति GB आकारले जातात. वर नमूद केलेल्या प्लॅन्सप्रमाणे हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील ऑफर करतो. तसेच, या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime आणि Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळतील.

लक्षात घ्या, जर तुम्ही Netflix प्लॅन घेतलात तर तुम्हाला ते महाग वाटू शकते. कारण, प्रत्यक्षात Netflix चा एक महिन्याचा स्टँडर्ड प्लॅन 499 रुपयांना उपलब्ध आहे. तर, नेटफ्लिक्सच्या वार्षिक प्लॅनसाठी तुम्हाला 5,988 रुपये मोजावे लागतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo