भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio नेहमीच बातम्यांमध्ये असते. Jio ने वापरकर्त्यांच्या गरजेनुसार ऑफर केलेल्या या प्लॅनमध्ये अनेक फायदे उपलब्ध आहेत. तर, यापैकी काही प्लॅन्समध्ये कंपनी अतिरिक्त डेटा देखील ऑफर करते. विशेष बाब म्हणजे प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त डेटासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. जर तुम्ही देखील Jio चे ग्राहक असाल आणि असा काही प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला मोफत अतिरिक्त डेटा मिळेल, तर हा रिपोर्ट खास तुमच्यासाठी आहे.
Jio च्या 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा दिला जात आहे. यामध्ये ग्राहकांना अतिरिक्त 6GB डेटा मिळत आहे. त्याबरोबरच, यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS देखील ऑफर केले जातात. या प्लॅनमध्ये OTT फायदे देखील समाविष्ट आहेत, ज्यात Sony Liv, Zee5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, Sunnext, Chaupal, DocuBay, Epic On, Hoichoi इत्यादी OTT चॅनेलचे सदस्यत्व मिळेल.
Jio च्या 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. यासह तुम्हाला या प्लॅनमध्ये 20GB अतिरिक्त डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 100SMS दररोज उपलब्ध आहेत. हा एक दीर्घकाळ वैधता असणारा प्लॅन आहे, जो 90 दिवसांच्या सेवा वैधतेसह येतो.
Jio चा 1,198 रुपयांचा प्लॅन संपूर्ण 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, 18GB अतिरिक्त डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100SMS ऑफर केले जात आहेत. या प्लॅनमध्ये Prime Video Mobile, Disney+Horstar, Sony Liv, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, DocuBay, EpikOn, SunNext, Hoichoi, Chaupal, Hoichoi, इ. OTT फायदे देखील उपलब्ध आहेत.
Jio चा 4,498 रुपयांचा प्लॅन 2GB दैनिक डेटासह येतो. त्याबरोबरच, हा प्लॅन 78GB अतिरिक्त डेटासह देखील ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची सेवा वैधता 365 दिवसांची आहे. या प्लॅनमधेय देखील Prime Video, Disney+Horstar, Sony Liv, ZEE5, JioCinema इ. सारखे OTT फायदे मिळतील.
वरील सर्व प्लॅन्स रिलायन्स Jio च्या अमर्यादित 5G डेटा ऑफरसह येतात. कारण टेलिकॉम कंपनी 239 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या प्रत्येक प्लॅनमध्ये 5G डेटा प्रदान करते.