तुम्ही Disney+ Hotstar वर T20 क्रिकेट वर्ल्ड कप विना अडथडा बघू शकता.
रिलायन्स JIO च्या प्रीपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनसह Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन उपलब्ध
पात्र युजर्सना Jio चे प्लॅन्स अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील मिळेल.
क्रिकेट चाहत्यांसाठी आम्ही टेक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या T20 Cricket World Cup सुरु आहे. क्रिकेट लव्हर्स हे सामने विना अडथडा पाहण्यासाठी काही बेस्ट रिचार्ज प्लॅन्स शोधत असतील. तुम्ही Disney+ Hotstar वर T20 क्रिकेट वर्ल्ड कपचा आनंद घेऊ शकता. लक्षात घ्या की, रिलायन्स JIO कंपनीच्या प्रीपेड आणि ब्रॉडबँड प्लॅनसह Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन मोफत ऑफर करत आहे. बघुयात यादी-
वर सांगितल्याप्रमाणे, Reliance Jio काही प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह Disney+Hotstar चे सब्स्क्रिप्शन देत आहे. यासाठी तुम्ही 328 रुपये, 331 रुपये आणि 388 रुपयांच्या किमतीत हे प्लॅन खरेदी करू शकता. त्याबरोरबच, 598 रु., 758 रु., 808 रुपयांव्यतिरिक्त 3178 रु., 1198 रु. आणि 4498 रुपयांचे प्लॅन देखील आहेत. नमूद केलेल्या सर्व प्लॅनसह तुम्ही Disney + Hotstar चे फ्री सबस्क्रिप्शन मिळवू शकता.
बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio चे हे सर्व प्लॅन्स वेगवेगळे बेनिफिट्स देतात. काही प्लॅन्ससह तुम्हाला JioTV प्रीमियमचा ऍक्सेस मिळेल. तर, काही प्लॅनसह तुम्हाला फक्त Disney+ Hotstar चा ऍक्सेस मिळणार आहे. एवढेच नाही तर, वर नमूद केलेले जवळपास सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटासह येतात. 5G पात्र ग्राहक सहज या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
Jio ब्रॉडबँड प्लॅन्स
Disney+ Hotstar च्या सबस्क्रिप्शनसह तुम्हाला Rs 599, Rs 888, Rs 1199, Rs 999, Rs 1499, Rs 2499, Rs 3999 आणि 8,499 रुपयांचे प्लॅन्स मिळतील. त्याबरोबरच, Jio AirFiber सोबतही असेच काही प्लॅन्स मिळतात. हे सर्व प्लॅन्स तुम्ही Disney + Hotstar मध्ये ऍक्सेस देतात. असे केल्याने तुम्ही T20 Cricket World Cup चा सहज आनंद घेऊ शकता.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.