84 दिवसांच्या वैधतेसह रिलायन्स JIOचा सर्वात जबरदस्त प्लॅन, मिळेल Disney + Hotstar मोफत

84 दिवसांच्या वैधतेसह रिलायन्स JIOचा सर्वात जबरदस्त प्लॅन, मिळेल Disney + Hotstar मोफत
HIGHLIGHTS

84 दिवसांच्या वैधतेसह रिलायन्स JIO चे तीन जबरदस्त प्लॅन्स

प्लॅनमध्ये कॉलिंग, डेटासह इतर फायदे उपलब्ध

या प्लॅनमध्ये Disney+ Hotstar बेनिफीटदेखील उपलब्ध

रिलायन्स JIO अधिक वैधतेसह असलेल्या अनेक प्लॅनमध्ये युजर्सना उत्तम फायदे देत आहे. आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत. हे प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह आणि Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतात. या प्लॅन्समध्ये तुम्हाला फ्री कॉलिंगसह 252 GB पर्यंत डेटा देखील मिळेल.

हे सुद्धा वाचा : 'जामतारा 2'चा ट्रेलर आऊट ! नव्या सीझनमध्ये दिसणार नवे घोटाळे, बघा व्हीडिओ

JIO चा 783 रुपयांचा प्लॅन

JIO चा हा प्लॅन 84 दिवसांचा आहे. यामध्ये, कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 1.5 GB नुसार एकूण 126 GB डेटा देत आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS येतात. या प्लॅनच्या ग्राहकांना कंपनी 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाईलचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ ऍप्सचा फ्री ऍक्सेसही मिळेल.

JIO चा 1066 रुपयांचा प्लॅन 

84 दिवस चालणाऱ्या Jio च्या या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 2 GB डेटा मिळेल. प्लॅनची खास गोष्ट म्हणजे कंपनी यामध्ये 5 GB अतिरिक्त डेटा देखील देत आहे, ज्यामुळे प्लॅनमध्ये एकूण डेटा 173 GB मिळतो. प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत SMS सह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग देखील देत आहे. प्लॅनमध्ये, कंपनी 1 वर्षासाठी Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचाही फ्री ऍक्सेस मिळतो.

JIO चा 1199 रुपयांचा प्लॅन

84 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 3 GB डेटा मिळेल. दैनिक 3 GB नुसार, या प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 252 GB होतो. तसेच, यात तुम्हाला दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत SMS ही मिळतील. हा प्लॅन इतर प्लॅन्सप्रमाणे Disney+ Hotstar वर फ्री ऍक्सेस देखील देते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo