Jio ने वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स सादर केले आहेत. अनेक युजर्स घरून ओनलाईन स्वरूपात काम किंवा कुठलाही कोर्स करतात. युजर्सच्या या गरज लक्षात घेऊन कंपनीने भरपूर डेटासह प्लॅन्स सादर केले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. एवढेच नाही तर, OTT ॲप्ससह प्रीमियम ॲप्सचे सबस्क्रिप्शनही प्लॅनमध्ये मोफत मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात, Jio च्या या उत्तम प्रीपेड प्लॅन्सबद्दल सर्व माहिती-
हे सुद्धा वाचा: Airtel चे सर्वात जबरदस्त प्लॅन्स! Unlimited बेनिफिट्ससह हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळेल अगदी मोफत। Tech News
Jio चा हा प्रीपेड प्लॅन 30 दिवसांच्या कालावधीसह येतो. यामध्ये दररोज 2.5GB डेटा म्हणजेच तुम्हाला वैधतेदरम्यान एकूण 75GB डेटा दिला जात आहे. 2.5GB डेटासह येणारा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यामध्ये अमर्यादित कॉलिंग 100SMS देखील उपलब्ध आहेत. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये JioTV, JioCinema आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
यादीतील दुसरा Jio प्लॅन 2,999 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात दररोज 2.5GB डेटा आणि 100SMS दिला जात आहे. त्याबोरबरच, अखंड कॉलिंगसाठी तुम्हाला प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे. OTT बेनिफिट्समध्ये Jio TV, Cinema आणि Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे या रिचार्ज प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची आहे.
यादीतील 3,662 रुपयांचा प्लॅन हा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन आहे. हा वार्षिक वैधतेसह येणारा म्हणजेच एकूण 365 दिवसांचा प्रीपेड प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा मिळतो. त्याबोरबरच, 100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, प्लॅनसोबत Jio TV, Cinema आणि क्लाउडचा ॲक्सेस दिला जाणार आहे. यामध्ये Sony Liv आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन देखील मोफत उपलब्ध आहे.