प्रसिद्ध टेलिकम दिग्गज कंपनी रिलायन्स Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. हे प्लॅन्स हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि प्रीमियम ॲप्स सारखे अनेक बेनिफिट्स देतात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला एका अशा प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 300GB डेटा मिळणार आहे. एवढेच नाही तर, हे प्लॅन्स प्रसिद्ध OTT सब्स्क्रिप्शन आणि अमर्यादित कॉलिंगसारख्या भारी बेनिफिट्ससह येतात.
Jio चा 1549 रुपयांचा प्लॅन हा कंपनीचा पोस्टपेड प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये तब्बल 500GB डेटा रोलओव्हरसह 300GB डेटा दिला जात आहे. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये विना अडथडा कॉलिंगसाठी अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS उपलब्ध आहेत. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. होय, हा प्लॅन Netflix आणि Amazon Prime Lite चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जात आहे. त्याबरोबरच, Jio क्लाउड, Jiocinema आणि Jio TV चा ऍक्सेस मिळणार आहे.
Jio चा 749 रुपयांचा प्लॅन एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, इंटरनेट वापरण्यासाठी हा प्लॅन 100GB डेटा रोलओव्हर सुविधेसह येतो. तर, तुम्ही या प्लॅनमध्ये कुटुंबातील 3 सदस्य जोडू शकता. सदस्यांना अतिरिक्त 5GB डेटा मिळणार आहे. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये Netflix आणि Amazon Prime Lite चा ॲक्सेस मोफत मिळणार आहे. Jio क्लाउड आणि Jio सिनेमाचे ऍक्सेस मिळणार आहे.
Jio चा 649 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन देखील अप्रतिम बेनिफिट्ससह येतो. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio च्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा देत आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100SMS उपलब्ध आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, सिनेमा आणि क्लाउडचा ॲक्सेस मोफत दिला जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला फॅमिली ऍड-ऑनची सुविधा मिळणार नाही.