दररोज 2GB डेटा आणि Unlimited कॉलिंगसह Jio चे अप्रतिम प्लॅन्स, किंमत 249 रुपयांपासून सुरु। Tech News
दररोज 2GB डेटासह येणाऱ्या Jio प्लॅन्सची यादी
2GB डेटासह येणाऱ्या प्लॅन्सची किंमत 249 रुपये इतकी आहे.
प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि OTT लाभ देखील उपलब्ध
रिलायन्स JIO ही सध्या भारतीय टेलिकॉम कंपन्यांमधील एक अशी कंपनी आहे, जी वापरकर्त्यांच्या गरजेनुसार मोफत कॉलिंगसह अधिक डेटासह योजना ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्व 2GB डेली डेटासह येणाऱ्या प्रीपेड पॅकची माहिती देणार आहोत. प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, SMS लाभ आणि बरेच काही मिळेल. बघा यादी-
Jio चा 249 रुपयांचा प्लॅन:
या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. या रिचार्जमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. यासह, दररोज 100SMS आणि काही Jio Appsची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 46GB डेटा मिळतो.
Jio चा 299 रुपयांचा प्लॅन:
या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 2GB 4G डेटा आणि सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधेसह मिळेल. यासोबतच दररोज 100SMS आणि काही जिओ Apps ची सुविधा दिली जात आहे.
Jio चा 533 रुपयांचा प्लॅन:
या प्लॅनमध्ये कंपनी 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ऑफर करत आहे. त्याबरोबरच, रिचार्जमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग, दररोज 100SMS आणि काही Jio Apps ची सुविधा देखील मिळणार आहे.
Jioचा 719 रुपयांचा प्लॅन:
हा डेली 2GB डेटासह कंपनीचा दीर्घ वैधतेसह येणारा प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 719 रुपये आहे आणि यात 84 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. या अंतर्गत तुम्हाला एकूण 168GB डेटा मिळतो. त्याबरोबरच, सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगच्या सुविधेसह, दररोज 100 SMS आणि काही Jio Apps देखील उपलब्ध असतील.
Jio चा 1,099 रुपयांचा प्लॅन
या रिचार्जमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे 2GB दैनिक डेटाचा लाभ मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता दिली जात आहे. रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला दररोज 100SMS चा लाभ देखील मिळेल. विशेष म्हणजे कंपनी या प्लॅनमध्ये Netflix मोबाईल सबस्क्रिप्शनची सुविधा देखील देते.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile