Jio ने यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपल्या टॅरिफ प्लॅनची किंमत वाढवली होती. या वाढीनंतरही दूरसंचार कंपनी Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक परवडणारे प्रीपेड प्लॅन्स आहेत. हे प्लॅन्स अगदी परवडणाऱ्या श्रेणीमध्ये येतात. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि सुपरफास्ट डेटा दिला जात आहे. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 300 रुपयांअंतर्गत येणाऱ्या Jio प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. पहा यादी-
दरवाढीनंतर Jio कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन 198 रुपयांचा आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 2GB डेटा दिला जाणार आहे. या पॅकमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS मिळतात. या प्लॅनमध्ये Jio क्लाउड, Jio Cinema आणि Jio TV चे सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता देखील दिली जात आहे.
यादीतील Jio च्या या दुसऱ्या प्रीपेड प्लॅनची किंमत 239 रुपये आहे. या रिचार्ज पॅकमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. हा प्लॅन संपूर्ण 22 दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तसेच, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा ऍक्सेस देखील मिळणार आहे.
यादीतील तिसरा प्लॅन हा टेलिकॉम कंपनी Jio चा लोकप्रिय रिचार्ज प्लॅन आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये एकूण 42GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100SMS दिले जात आहेत. इतर प्लॅन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये Jio TV, Cinema आणि Cloud चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. हा प्लॅन जवळपास एक महिना म्हणजेच 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. Jio ने अलीकडेच एक नवी ऑफर जाहीर केली आहे, येथे क्लिक करा.