Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शन आणि Unlimited बेनिफिट्ससह Jio प्लॅन्सची यादी, किंमत फक्त 328 रुपयांपासून सुरु। Tech News 

Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शन आणि Unlimited बेनिफिट्ससह Jio प्लॅन्सची यादी, किंमत फक्त 328 रुपयांपासून सुरु। Tech News 
HIGHLIGHTS

दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio कडे जवळपास 44 कोटी युजर्स आहेत.

अलीकडे कंपनीने अनेक OTT सब्स्क्रिप्शनसह प्लॅन्स लाँच केले आहेत.

कंपनीचे Disney Plus Hotstar सब्स्क्रिप्शनसह येणाऱ्या प्लॅन्सची यादी

शीर्षस्थानी असलेली देशातील दूरसंचार कंपनी रिलायन्स Jio कडे जवळपास 44 कोटी युजर्स आहेत. या वापरकर्त्यांसाठी, कंपनी वेळोवेळी उत्तम प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत असते. अलीकडे कंपनीने अनेक OTT सब्स्क्रिप्शनसह प्लॅन्स लाँच केले आहेत. जिओच्या या नवीन प्लॅनमध्ये तुम्ही नवीनतम चित्रपट आणि ड्रामा शोचा आनंद घेऊ शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कंपनीचे Disney Plus Hotstar सब्स्क्रिप्शनसह येणाऱ्या प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत.

Jio चा 328 रुपयांचा प्लॅन

या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा उपलब्ध आहे. याशिवाय मोफत कॉलिंग आणि दररोज 100SMS उपलब्ध आहेत. यासह, युजर्ससाठी Disney+ Hotstar मोबाईलचे सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये 3 महिन्यांसाठी उपलब्ध असेल.

jio Swiggy One Lite subscription Plan

Jio चा 331 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना मनोरंजनासाठी तीन महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्याबरोबरच, इतर बेनिफिट्समध्ये मोफत कॉलिंग, दररोज 100 SMS आणि एकूण 40GB डेटा उपलब्ध आहे. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Jio चा 388 रुपयांचा प्लॅन

तर 388 रुपयांच्या 28 दिवसांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय जिओच्या या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग, दररोज 100SMSची सुविधा मिळेल. याशिवाय, मनोरंजनासाठी मोबाइलचे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Jio चा 590 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1 वर्षासाठी Disney Plus Hotstar मोबाईलवर मोफत कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 2 GB डेटा मिळतो. त्याच वेळी, प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे.

disney+ Hotstar offer on jio plan

Jio चा 758 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये देखील वरील प्लॅनप्रमाणे ग्राहकांना तीन महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 1.5 GB डेटा दररोज ऑफर केला जात आहे.

Jio चा 808 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये ग्राहकांना तीन महिन्यांसाठी Disney Plus Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन, मोफत कॉलिंग, दररोज 100SMS मिळत आहेत. परंतु, जर आपण डेटाबद्दल बोललो तर वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा ऑफर केला जात आहे.

Jio चा 3,178 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 1 वर्षाच्या प्लॅनबद्दल बोलायचे तर दररोज 2GB डेटासह, तुम्हाला Disney + Hostar मोबाईल देखील एका वर्षासाठी मोफत मिळणार आहे. प्लॅनमधील इतर बेनिफिट्समध्ये तुम्हाला दररोज 100SMS आणि विनामूल्य कॉलिंगचा लाभ मिळेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo