Jio यूजर्सना मोठा झटका! पुढील महिन्यापासून प्रीपेड-पोस्टपेड प्लॅन्सचे दर महागणार, किमतीत 25% वाढ

Updated on 05-Jul-2024
HIGHLIGHTS

Jio ने आपल्या बहुतेक प्लॅन्सचे दर 25% वाढवले आहेत.

Jio प्लॅन्सच्या या नवीन किमती येत्या 3 जुलैपासून लागू होतील.

केवळ Jio च्या महागड्या प्लॅनमध्ये 5G अमर्यादित डेटा मिळेल.

Jio: भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम दिग्गज Jio कंपनी आपल्या यूजर्ससाठी अनेक प्रकारचे प्लॅन्स सादर करते. तुम्ही देखील Jio चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चिंताजनक बातमी आहे. कंपनीने आपले अनेक प्लॅन्स महाग केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅन्सच्या यादीमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही विभागांचा समावेश आहे. कंपनीने आपल्या बहुतेक प्लॅन्सचे दर 25% वाढवले आहेत.

Also Read: 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरासह Vivo T3 Lite 5G भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप 5 फीचर्स

Jio ने नुकतेच गुरुवारी, आपल्या नवीन प्लॅन्सची घोषणा केली आहे. हे कंपनीचे नवीन प्लॅन्स नाही, तर कंपनीने आता आपल्या सध्याच्या प्लॅनची ​​किंमत वाढवली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या नवीन किमती 3 जुलैपासून लागू होतील. बघा संपूर्ण यादी-

Jio प्रीपेड प्लॅन्सच्या नव्या किमती

  • 155 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 189 रुपये झाली आहे. बेनिफिट्समध्ये, हा प्लॅन्स 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, ज्यामध्ये 2GB डेटा सुविधा उपलब्ध आहे.
  • 209 रुपयांचा प्लॅन 249 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 1GB दैनिक डेटा मिळतो.
  • 239 रुपयांचा प्लॅन 299 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा मिळतो.
  • 299 रुपयांचा प्लॅन 249 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 349 रुपयांचा प्लॅन 399 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2.5GB दैनिक डेटा मिळेल.
  • 399 रुपयांचा प्लॅन 449 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 3GB दैनिक डेटा मिळेल.
  • 479 रुपयांचा प्लॅन 579 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 533 रुपयांचा प्लॅन 629 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह 2GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 395 रुपयांचा प्लॅन 479 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह 6GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 666 रुपयांचा प्लान 799 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये, 84 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 719 रुपयांचा प्लॅन 859 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह 2GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 999 रुपयांचा प्लान 1199 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह 3GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.
  • 1559 रुपयांचा प्लॅन 1899 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 336 दिवसांच्या वैधतेसह 24GB डेटा उपलब्ध आहे.
  • 2999 रुपयांचा प्लॅन 3599 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह 2.5GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.

Jio ॲड-ऑन पॅक

  • 15 रुपयांचा प्लॅन 19 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या प्लॅनमध्ये बेस प्लॅनच्या वैधतेनुसार 1GB डेटा उपलब्ध आहे.
  • 25 रुपयांचा प्लॅन 29 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 2GB डेटा उपलब्ध आहे.
  • 61 रुपयांचा प्लॅन 69 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 6GB डेटा उपलब्ध आहे.
  • 239 रुपयांचा प्लॅन 299 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा उपलब्ध आहे.

Jio पोस्टपेड प्लॅन

  • 299 रुपयांचा प्लॅन आता 349 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 30GB डेटा उपलब्ध आहे.
  • 399 रुपयांचा प्लान 449 रुपयांना खरेदी करता येईल. या प्लॅनमध्ये 75GB डेटा आहे.

केवळ Jio च्या महागड्या प्लॅनमध्ये 5G अमर्यादित डेटा मिळेल.

Jio ने पुष्टी केली आहे की, प्लॅन्सची 5G अमर्यादित डेटा सुविधा आता फक्त अशा ग्राहकांसाठी उपलब्ध असेल ज्यांचे प्लॅन दररोज 2GB किंवा अधिक डेटा देतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :