भारतातील आघाडीची टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio ग्राहकांना अनेक प्रीपेड प्लॅन ऑफर करते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला एका अप्रतिम प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत. अतिरिक्त डेटा आणि OTT लाभांसह प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. या टेलिकॉम कंपनीचा हा नवीन प्लॅन नसून काही महिन्यांपूर्वीच हा प्लॅन सादर करण्यात आला होता. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त 4G डेटा आणि OTT व्यतिरिक्त अमर्यादित 5G डेटा देखील मिळतो. जाणून घेऊयात प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
रिलायन्स Jio चा 398 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या अत्यंत कमी सेवा वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा म्हणजेच 28 दिवसांसाठी एकूण 56GB डेटा मिळतो. कंपनी या पॅकसह 6GB बोनस डेटा देखील देत आहे. तुम्ही Jio च्या डेटा व्हाउचर सेक्शन पाहिल्यास 6GB डेटा व्हाउचरची किंमत 61 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, डेटाची FUP मर्यादा वापरल्यानंतर इंटरनेटचा वेग कमी होऊन 64Kbps होईल.
कॉलिंगबद्दल बोलायचे झाल्यास, येथे तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. त्याबरोबरच, दररोज 100SMS ची सुविधाही मिळेल. याशिवाय, अमर्यादित 5G डेटाचा लाभही दिला जाईल. जर तुम्ही Jio च्या 5G कव्हरेज क्षेत्रात राहत असाल आणि तुमचा फोन 5G SA ला सपोर्ट करत असेल, तर तुम्हाला Jio कडून अमर्यादित 5G डेटाचा लाभ देखील मिळेल.
विशेष बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये OTT बेनिफिट्स देखील समाविष्ट आहेत. सर्वप्रथम, Jio च्या ग्राहकांना JioTV Premium चा ऍक्सेस दिला जातो. त्याबरोबरच, या अंतर्गत वापरकर्त्यांना SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lanka, Planet Marathi, Chaupal, DocuBay, EPIC ON, Hoichoi, JioTV आणि JioCloud सारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्मवर ऍक्सेस मिळतो.