Jio चा Best प्लॅन! दररोज 5GB डेटासह Free मिळेल अतिरिक्त 16GB डेटा, जाणून घ्या किंमत

Jio चा Best प्लॅन! दररोज 5GB डेटासह Free मिळेल अतिरिक्त 16GB डेटा, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

जबरदस्त बेनिफिट्ससह येणाऱ्या Jio च्या या प्लॅनची किंमत 699 रुपये आहे.

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 16GB अतिरिक्त डेटा अगदी मोफत मिळेल.

यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतील.

Jio ही भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. Jio कंपनी आपल्या वापरकर्त्यांसाठी अनेक प्रकारचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करते. एवढेच नाही तर, अनेक प्लॅनमध्ये रोजच्या डेटासोबतच यूजर्सना अतिरिक्त डेटाही दिला जातो. आज आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत. हा प्लॅन फक्त 700 रुपयांपेक्षा कमी किमतीत येतो. ज्यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात एक्सट्रा डेटा देण्यात येणार आहे.

reliance jio IMC 2023

Jio चा 699 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनची किंमत 699 रुपये आहे. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनची वैधता कमी आहे पण यासह मिळणारे बेनिफिट्स जबरदस्त आहेत. Jio च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना भरपूर डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना इतर प्लॅन्ससारखा 1GB किंवा 2GB डेटा नाही तर दररोज 5GB डेटा मिळणार आहे. 28 दिवसांच्या वैधतेनुसार Jio च्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 140GB डेटा मिळणार आहे.

वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनसह एक्सट्रा डेटाची सुविधा देखील देण्यात येणार आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 5GB डेटासह 16GB अतिरिक्त डेटा अगदी मोफतमध्ये मिळेल. हा 16GB डेटा युजर्सच्या रोजच्या डेटा कोट्यातून कट केला जाणार नाही. दैनिक डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग @64kbps पर्यंत कमी होईल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हा Jio चा एक JioLink प्लॅन आहे. JioLink हे कंपनीचे 4G मॉडेम आहे. जर तुमच्याकडे हे Jio मॉडेल असेल, तर तुम्ही Jio च्या या प्लॅनच्या रिचार्जसह भरपूर डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतील. तसेच, हा प्लॅन वापरकर्त्यांना Jio Apps चे मोफत सबस्क्रिप्शन देखील ऑफर करतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo