दीर्घकालीन वैधतेसह Jio चा अप्रतिम प्लॅन, मिळेल डेली 3GB डेटा, Unlimited कॉल्स आणि OTT सबस्क्रीप्शन। Tech News 

 दीर्घकालीन वैधतेसह Jio चा अप्रतिम प्लॅन, मिळेल डेली 3GB डेटा, Unlimited कॉल्स आणि OTT सबस्क्रीप्शन। Tech News 
HIGHLIGHTS

कथित Jio प्लॅनमध्ये तुम्हाला सुमारे तीन महिन्यांची वैधता मिळेल.

कंपनी या प्लॅनसह दररोज 3GB डेली डेटा ऑफर करते.

प्लॅनसोबत लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध

रिलायन्स Jio ने नुकतेच ग्राहकांसाठी एक उत्तम प्लॅन लाँच केला आहे, जो खूप अप्रतिम फायदे देतो. यामध्ये युजरला दररोज 3GB सुपरफास्ट इंटरनेट मिळते. प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील उपलब्ध आहे.एवढेच नाही, तर याव्यतिरिक्त कंपनीने या प्लॅनमध्ये मनोरंजनाची देखील पूर्ण काळजी घेतली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता या प्लॅन्सबद्दल सर्व तपशील जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा: Amazon GIF Saleमध्ये ‘या’ OnePlus फोनवर उत्तम डील्स मिळवा, मिळेल तब्बल 7,000 रुपयांपर्यंत Discount। Tech News

कथित Jio प्लॅनची किमंत 1,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये डेटा, कॉलिंग, OTT इ. बेनिफिट्स उपलब्ध आहेत.

jio
reliance jio best internet plan

JIO चा 1,499 रुपयांचा प्लॅन

JIO ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लॅन आणला आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो म्हणजेच तुम्ही सुमारे 3 महिन्यांसाठी या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग प्लॅन आहे, ज्यामध्ये कंपनी दररोज 3GB डेटा देत आहे. पण यावेळी कंपनीने या प्लॅनमध्ये एक आश्चर्यकारक लाभ देखील सादर केला आहे.

होय, JIO या प्लॅनसोबत लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix सबस्क्रिप्शन देखील देत आहे. म्हणजेच प्लॅनमध्ये कंपनीने तुमच्या मनोरंजनाची देखील संपूर्ण काळजी घेतली आहे. कंपनीने यामध्ये बेसिक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन दिले आहे. 252GB डेटासह आपण हवा तो आवडता शो बघू शकता. याशिवाय, प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत SMS देखील उपलब्ध आहेत.

Jio Postpaid plans under Rs 500

एवढेच नाही तर, तुम्हाला JioTV, JioCinema, JioCloud सारख्या Apps ची सदस्यता देखील मिळेल. तुम्ही JioTV वर अनेक प्रकारचे टीव्ही कार्यक्रम पाहू शकता. JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील यात दिले जाते, जेणेकरून तुम्ही तुमच्या मोबाईलवर चित्रपट, टीव्ही शो, क्रिकेट सामने इ. आनंद घेऊ शकता. याशिवाय, तुम्हाला प्लॅनमध्ये JioCloud सेवा मिळते, जी कमी इंटर्नल स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनमध्ये खूप उपयुक्त ठरते.

प्लॅनबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा MyJio App वरून 1499 रुपयांमध्ये सक्रिय केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo