भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio कडे भरपूर प्रीपेड प्लॅन्स आहेत. Jio च्या प्लॅन्समध्ये इंटरनेट वापरण्यासाठी सुपर फास्ट डेटा प्रदान केला जातो. Jio च्या पोर्टफोलिओमध्ये विविध श्रेणीतील अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. या प्लॅन्समध्ये डेटासह अमर्यादित कॉलिंग आणि SMS दिले जातात. त्याबरोबरच, एंटरटेनमेंट प्लॅनमध्ये OTT ॲपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. मिळतो. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला कंपनीच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 80 पेक्षा जास्त दिवसांची वैधता भरपूर डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन देखील मिळेल. जाणून घ्या किंमत आणि संपूर्ण तपशील-
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio च्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 1,299 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातो. तसेच, या प्लॅनमध्ये मोफत व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे, त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS मिळतात. इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, रिचार्ज प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चा ॲक्सेस मोफत दिला जात आहे.
वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये इतर बेनिफिट्स देखील देण्यात आले आहेत. होय, या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची देखील सोय करण्यात आली आहे. Jio च्या प्रीपेड प्लॅनमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म Netflix चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. नेटफ्लिक्ससाठी यात वेगळे सब्स्क्रिप्शन घेण्याची गरज नाही. टेलिकॉम कंपनी Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅनची वैधता 84 दिवस इतकी निश्चित केली आहे.
अर्थातच तुम्ही हा प्लॅन जवळपास तीन महिन्यांसाठी वापरण्यास सक्षम असाल. तुम्ही देखील दर महिन्याला रिचार्ज करण्यापासून वैतागले आहात, तर तुमच्यासाठी हा प्लॅन उत्तम ठरेल. तसेच, मनोरंजाची देखील सोय करायची असल्यास हा प्लॅन उपयुक्त आहे. तुम्हाला Jio कंपनीच्या अधिकृत वेबसाइट किंवा MyJio मोबाइल ॲपला भेट देऊन रिचार्ज खरेदी करता येईल.
प्रसिद्ध दूरसंचार कंपनी Jio ने अलीकडेच एक स्वस्त डेटा व्हाउचर सादर केला आहे. या प्लॅनची किंमत केवळ 11 रुपये इतकी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या पॅकमध्ये तब्बल 10GB डेटा मिळतो. हे बेनिफिट तुम्हाला केवळ 1 तासाच्या वैधतेसह मिळेल. लक्षात घ्या की, तुम्ही हा पॅक तुमच्या विद्यमान प्लॅनसह 1 तासासाठी वापरू शकता. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा.