कोणत्याही रिचार्जची गरज नाही, वर्षभरासाठी JIO मोफत देतेय अमर्यादित कॉलिंग, डेटा

Updated on 25-Jan-2023
HIGHLIGHTS

एकही रुपया खर्च न करता मिळेल डेटा आणि अमर्यादित कॉलिंग

सुरुवातीच्या काळात JIO ने युजर्सना अमर्यादित कॉलिंग, डेटा पूर्णपणे मोफत दिला होता.

Jio अनेक पोस्टपेड प्लॅन आहेत, ज्यात तुम्हाला हे लाभ मिळतील.

सुरुवातीच्या काळात JIO ने युजर्सना अमर्यादित कॉलिंग, डेटा पूर्णपणे मोफत दिला होता. यामुळेच अल्पावधीतच युजर्सकडून जिओला खूप पसंती मिळाली. आता जिओचे असे अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात तुम्हाला एक किंवा दोन नंबर अगदी मोफत दिले जातात. तुम्हाला फक्त एका क्रमांकाचे बिल भरावे लागेल आणि त्यासोबत अतिरिक्त क्रमांकाची सुविधा दिली जाईल. 

हे सुद्धा वाचा : 'BharOS' च्या टेस्टिंगनंतर समोर आले महत्त्वपूर्ण फीचर्स…

Jioचा 199 रुपयांचा प्लॅन

Jio 199 प्लॅन देखील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. पण यामध्ये तुम्हाला अतिरिक्त सिम कार्ड मिळत नाही. या प्लॅनमध्ये 25GB डेटा मिळतो. यासह, दररोज 100 SMS दिले जातात. हे अशा वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरू शकते ज्यांना कमी किंमतीत अधिक फायद्यांसह प्लॅन खरेदी करायचे आहे.

599 रुपयांचा फॅमिली प्लॅन

 यामध्ये आपल्याला मंथली 599 रुपये द्यावे लागतील. हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग ऑफर करतो. एकूण 100 GB डेटा यात दिला जातो. परंतु याशिवाय सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला 1 अतिरिक्त सिम कार्डची सुविधा दिली जाते. तसेच, यामध्ये Netflix ची सदस्यता पूर्णपणे विनामूल्य दिली आहे.

Jio चा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

Jio चा 799 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला 2 अतिरिक्त सिम कार्ड मिळतात. म्हणजेच, तुम्हाला एका नंबरचे बिल भरावे लागेल आणि त्यासोबत तुम्हाला 2 अतिरिक्त सिम कार्ड मिळतील. पण त्याची खासियत म्हणजे तुम्हाला फक्त एकाच नंबरचे बिल भरावे लागते. परंतु सर्व नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये Netflix सबस्क्रिप्शन देखील पूर्णपणे मोफत दिले जाते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :