Jio ची धमाल ऑफर! ‘या’ रिचार्ज प्लॅन्ससह मिळतोय तब्बल 40GB डेटा मोफत

Updated on 11-May-2023
HIGHLIGHTS

Jio क्रिकेट प्रीपेड बेस प्लॅन्स

प्लॅनमध्ये डेली 3GB डेटासह एक्सट्रा ऍड-ऑन व्हाउचर मिळेल.

विशेष ऑफरमध्ये 61 रुपयांचे 6GB डेटा ऍड-ऑन व्हाउचर मोफत

IPL 2023 साठी Jio ने नवीन क्रिकेट प्लॅन जारी केले. हे प्लॅन युजर्सना अमर्यादित कॉलिंग, SMS आणि 5G सह 3GB डेली डेटा पॅक ऑफर करतात. विशेषतः कंपनी 40GB अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. या यादीत रिलायन्स JIO चे 219 रुपये, 399 रुपये आणि 999 रुपयांचे प्लॅन आहेत. 

JIO चा 219 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 3GB दैनिक डेटा आहे. त्यासोबत, 14 दिवसांसाठी Jio ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. 5G पात्र ग्राहकांसाठी अमर्यादित डेटा कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय मिळेल. 

JIO चा 399 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. वरील प्लॅनप्रमाणे यामध्ये देखील अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 3GB दैनिक डेटा मिळेल. तसेच, जिओ ऍप्सचे ऍक्सेसही मिळणार आहे. प्लॅनमध्ये विशेष ऑफर म्हणून, 61 रुपयांचे 6GB डेटा ऍड-ऑन व्हाउचर मोफत उपलब्ध आहे. 

Jio चा 999 रुपयांचा प्लॅन

 Jio च्या या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS आणि 84 दिवसांसाठी 3GB दैनिक डेटा मिळतो. 5G वापरकर्ते मर्यादित कालावधीसाठी 241 रुपयांचा 40GB मोफत अतिरिक्त डेटा देखील घेऊ शकतात. यासह Jio ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :