भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio ला आज भारतात 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी, कंपनी निवडक रिचार्ज पॅकवर अतिरिक्त डेटा आणि विशेष व्हाउचर ऑफर करत आहे. ही उत्तम ऑफर आजपासून म्हणजे 5 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत वैध आहे. या वर्धापन दिनानिमित्त Jio आपल्या वापरकर्त्यांना आणखी कोणते फायदे देत आहे ते जाणून घेऊया.
जिओ अतिरिक्त डेटा ऑफर करत असलेल्या निवडक प्लॅन्समध्ये 299 रुपये, 749 रुपये आणि 2,999 रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे.
JIO च्या 7 व्या वर्धापन दिन ऑफरचा एक भाग म्हणून कंपनी 299 रुपयांचा प्रीपेड पॅकमध्ये 7GB अतिरिक्त डेटा ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटा दिला जातो. याशिवाय, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100SMS ची सुविधा देखील मिळते.
प्लॅनमध्ये ऑफरअंतर्गत 14GB अतिरिक्त डेटा दिला जात आहे. यासाठी 7GB चे दोन डेटा कूपन दिले जातील.
या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा आहे. हा प्लॅन 90 च्या वैधतेसह येतो. डेटाबद्दल बोलायचे झाल्यास या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा प्रदान केला जातो.
JIO च्या 2,999 रुपयांच्या पॅकमध्ये, वर्धापनदिनानिमित्त 21GB अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. यासाठी ग्राहकांना 7GB डेटाचे 3 कुपन्स दिले जाणार आहेत. 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. या पॅकची वैधता 365 दिवस आहे.
याव्यतिरिक्त, ग्राहकांना Ajio वर 200 रुपये सूट, Netmeds वर 20 टक्के सूट म्हणजेच 2800 रुपयांपर्यंत व्हाउचर, Swiggy वर 100 रुपये सूट, 2,149 रुपये आणि त्यावरील खरेदीवर मोफत McDonald's meal, रिलायन्स डिजिटलवर 10% सूट उपलब्ध आहे. तसेच, फ्लाइटवर 1,500 सूट आणि हॉटेल्सवर 15% सूट मिळणार आहे.