Jio Offer : एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्या आणि मिळवा 1GB डेटा, वाचा डिटेल्स

Updated on 12-May-2023
HIGHLIGHTS

JIO ऑफर अँड्रॉइड आणि iPhone दोन्ही वापरकर्त्यांसाठी

युजर्सना क्रिकेटशी संबंधित साध्या गोष्टींचे उत्तर द्यावे लागेल.

1GB डेटा मोफत मिळवण्याची प्रक्रिया बघा

Jio वापरकर्त्यांसाठी एक भारी ऑफर आणली आहे. ही ऑफर अँड्रॉइड आणि iPhone दोन्ही वापरकर्त्यांसाठी आहे. यासाठी वापरकर्त्यांना एका साध्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल, त्या बदल्यात वापरकर्त्यांना 1GB इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहे. MyJio ऍपमध्ये युजर्सना ऑफर, रिचार्ज, म्युझिक, गेम आणि मोबाइल बँकिंग इत्यादी सर्व्हिस मिळतात.  नव्या ऑफरबाबत सविस्तर जाणून घेऊयात- 

कुटुंबासह सिंगापूरची ट्रिप

ऑफर अंतगर्त, युजर्सना क्रिकेटशी संबंधित साध्या गोष्टींचे उत्तर द्यावे लागेल. यासह, युजर्स कुटुंबासह सिंगापूरची ट्रिप देखील जिंकू शकतात. त्याबरोबरच, स्पर्धकांना 1 वर्षाचा जिओ रिचार्ज देखील मिळू शकतो. यामध्ये वापरकर्त्यांना नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी यांसारखी काही बेसिक माहिती द्यावी लागेल. 

सहज मिळवा 1GB डेटा

सर्वप्रथम MyJio ऍप अपडेट करा. यात तुम्हाला JioEngage विभागात जावे लागेल. JioEngage विभागात Gems Cricket बॅनरवर क्लिक करा. यानंतर, तुमची बेसिक माहितीचा तपशील द्या. संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर, टर्म आणि कंडिशनवर क्लिक करा. यानंतर प्रश्नाचे उत्तर सबमिट करावे लागेल. जर तुमचे उत्तर बरोबर असले तर तुम्हाला 1GB इंटरनेट डेटा दिला जाईल.

मात्र लक्षात घ्या की, अहवालानुसार प्रत्येकच वापरकर्त्याला 1GB डेटा मिळेलंच असे नाही. काही वापरकर्त्यांना त्यापेक्षा कमी डेटा देखील मिळू शकतो. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :