Jio New Year Welcome Plan: कंपनीने लाँच केला 2025 चा नवा प्लॅन, मिळतील Unlimited बेनिफिट्स!
Jio कंपनीने न्यू इयर वेलकम प्लॅन अंतर्गत नवीन प्लॅन लाँच केला.
Jio ने या प्लॅनची किंमत 2025 रुपये इतकी ठेवली आहे.
हा न्यू इयर प्लॅन मर्यादित कालावधीसाठीच ऑफर करण्यात आला आहे.
Jio New Year Welcome Plan: भारतातील आघाडीची दिग्गज Jio दरवर्षी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची आकर्षक ऑफर सादर करते. अवघ्या काही दिवसांनी नवीन वर्ष सुरु होणार आहे. नेहमीप्रमाणे, यावर्षीही कंपनीने न्यू इयर वेलकम प्लॅन अंतर्गत नवीन प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने या प्लॅनची किंमत 2025 रुपये इतकी निश्चित केली आहे. लक्षात घ्या की, या प्लॅनमध्ये तुम्हाला तब्बल 200 दिवसांपर्यंत वैधता मिळणार आहे. यासोबतच प्लॅनमध्ये अनेक रोमांचक फायदे आणि ऑफर्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे लक्षात घ्या की, हा प्लॅन केवळ मर्यादित कालावधीसाठी ऑफर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सर्व बेनिफिट्स-
Jio New Year Welcome Plan
वर सांगितल्याप्रमाणे, Jio च्या या नवीन वर्षाच्या वेलकम प्लॅनची किंमत 2025 रुपये इतकी आहे. नवीन वर्ष 2025 साजरे करण्यासाठीच हा विशेष प्लॅन सादर करण्यात आला आहे. तुमच्या माहीतीसाठी सांगतो की, हा न्यू इयर प्लॅन मर्यादित कालावधीसाठीच ऑफर करण्यात आला आहे. ही ऑफर आज 11 डिसेंबर ते 11 जानेवारी 2025 पर्यंत लाईव्ह असेल. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
नव्या प्लॅन्सचे सर्व बेनिफिट्स
बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio च्या या प्लॅनमध्ये 200 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. हा दीर्घकालीन वैधतेसह येणारा विशेष प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB डेटा लाभ मिळेल. एवढेच नाही तर, यात अमर्यादित 5G डेटाची सुविधा देखील उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळेल.
होय, या प्लॅनद्वारे तुम्ही कोणत्याही नंबरवर तब्बल 200 दिवसांपर्यंत अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेण्यास सक्षम असाल. या प्लॅनसह तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स देखील मिळणार आहेत:
- तुम्हाला AJIO, Swiggy आणि EaseMyTrip प्लॅटफॉर्मवर 2,150 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळतील.
- तुम्ही AJIO वर 500 रुपयांचे कूपन अप्लाय करू शकता. तर, Swiggy साठी 150 रुपयांचे कूपन उपलब्ध मिळेल.
- EaseMyTrip फ्लाइट्सवर 1500 रुपयांपर्यंत सूट मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile