Jio New Year Welcome Plan 2025: टेलिकॉम दिग्गज मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स Jio ने अलीकडेच नवीन वर्षानिमित्त Jio New Year Welcome Plan 2025 जाहीर केली होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, न्यू इयर वेलकम ऑफरअंतर्गत या प्लॅनमध्ये दीर्घकालीन वैधतेसह 500GB डेटा ऑफर केला जातो. पण, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लक्षात घ्या की, या ऑफरचे केवळ तीन दिवस उरले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात प्लॅनची किंमत आणि बेनिफिट्स-
नेहमीप्रमाणे, या वर्षी देखील रिलायन्स Jio ने नवीन वर्षाचे स्वागत प्लॅन 2025 मागील महिन्यात सादर केले होते. मात्र, ही ऑफर केवळ 11 जानेवारीपर्यंतच उपलब्ध आहे. जर तुम्हाला सतत रिचार्ज करण्यापासून मुक्तता हवी असेल तर, तर हा दीर्घकालीन प्लॅन एक आकर्षक पर्याय आहे. रिचार्ज करण्यासाठी क्लिक करा!
Jio चा 2025 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना तब्बल 200 दिवसांसाठी अमर्यादित 5G इंटरनेट डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच, यात अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळेल. मात्र, ज्यांच्याकडे 4G कनेक्शन आहे, त्यांना दररोज 2.5GB डेटा मिळेल. यासह तुम्हाला प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेदरम्यान एकूण 500GB डेटा मिळणार आहे. त्याबरोबरच, संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना दररोज 100SMS देखील मिळतील. डेटा आणि व्हॉइस बेनिफिट्स व्यतिरिक्त, जिओ न्यू इयर वेलकम प्लॅन विविध कूपन देखील ऑफर करतो.
कुपन्सबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, ग्राहक 500 रुपयांच्या किमतीचे Ajio कूपन प्राप्त करण्यास पात्र आहेत. हे कुपन्स 2,500 च्या किमान खरेदी मूल्यावर रिडीम केले जाऊ शकतात. त्याबरोबरच, तुम्हाला Swiggy कडून 499 रुपयांच्या किंवा त्याहून अधिकच्या ऑर्डरवर 150 रुपयांचे व्हाउचर मिळेल. तर, Easemytrip.com च्या मोबाइल ॲप आणि वेबसाइटवर केलेल्या फ्लाइट बुकिंगवर 1500 रुपयांची सूट मिळणार आहे. उप्लब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे कूपन MyJio ॲपवर उपलब्ध असतील, जे Android आणि iOS या दोन्ही उपकरणांवर उपलब्ध आहेत.