Hurry up! Jio युजर्ससाठी भारी ऑफर, 31 डिसेंबरपूर्वी रिचार्ज करा आणि मिळवा तब्बल 1000 रुपयांचा कॅशबॅक। Tech News 

Hurry up! Jio युजर्ससाठी भारी ऑफर, 31 डिसेंबरपूर्वी रिचार्ज करा आणि मिळवा तब्बल 1000 रुपयांचा कॅशबॅक। Tech News 
HIGHLIGHTS

Jio देखील आपल्या प्लॅन्सवर Happy New Year ऑफर देत आहे.

Jio ची ही ऑफर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत वैध आहे.

या ऑफरअंतर्गत, तुम्ही तब्बल 1000 रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता.

नवीन वर्ष संपत आला आहे आणि या निमित्ताने अनेक कंपन्या आपल्या प्रोडक्टवर ऑफर्स जाहीर करत आहे. भारतातील टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio देखील याबाबतीत मागे नाही. Jio देखील आपल्या प्लॅन्सवर Happy New Year ऑफर देत आहे. तसेच, कंपनीने नवीन वर्षानिमित्त आणखी एक उत्तम ऑफर आणली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तब्बल 1000 रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता. ही ऑफर 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत वैध आहे.

तुम्ही देखील Jio युजर असाल तर, तुम्हाला या ऑफरचा आनंद घेण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वी रिचार्ज करावे लागेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

Jio 1000 रुपयांचा कॅशबॅक ऑफर

ऑफरबद्दल सविस्तर बोलायचे झाल्यास, जे Jio वापरकर्ते प्लॅन ऑनलाइन रिचार्ज करतात केवळ तेच या ऑफरचा लाभ घेण्यास सक्षम असतील. म्हणजेच, जर तुम्ही PhonePe, Paytm, Amazon Pay, Mobikwik, tataNeu इ. UPI पेमेंट सारखे ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म वापरत असाल तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो ही ऑफर Jio च्या सर्व प्लॅनवर लागू होईल.

Reliance Jio cheapest plan
Reliance Jio

Happy New Year ऑफर्स

तुम्ही PhonePe App द्वारे Jio रिचार्ज केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त 400 रुपयांपर्यंत रिवॉर्ड मिळेल. ही ऑफर पहिल्या आणि तिसऱ्या रिचार्जवर लागू होईल. तर, तुम्ही Paytm App वापरून तुमचा मोबाइल रिचार्ज केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त 1000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल. तसेच, तुम्हाला JIOPTM आणि JIODEC कोड वापरल्यास 1300 रुपयांचे बक्षीस मिळू शकते.

एवढेच नाही तर, Amazon Pay द्वारे 250 रुपयांचे बक्षीस दिले जात आहे, तर Mobikwik द्वारे जास्तीत जास्त 250 रुपयांची सुपरकॅश दिली जात आहे. तुम्हाला Mobikwik ZIP ऑफरमध्ये 25 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. त्याचप्रमाणे Amazon वर ICICI बँक क्रेडिट कार्ड ऑफरवर 2% सूट उपलब्ध आहे. Tata Neu HDFC बँक क्रेडिट कार्डमध्ये 5% निओ नाणी दिली जात आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo