आपणा सर्वांना माहितीच आहे की, जुलै महिन्याच्या सुरुवातीला तिन्ही खाजगी आणि टेलिकॉम दिग्गज कंपन्यांनी म्हणजेच JIO, AIRTEL आणि VI ने प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. अशा परिस्थितीत रिचार्जसाठी युजरच्या खिशावर मोठा परिणाम होऊ लागला. आता Jio ने ग्राहकांना दिलासा नवे प्लॅन्स आणून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. त्याप्रमाणे, रिलायन्स Jio नेही आपल्या ग्राहकांसाठी तीन नवीन रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. जाणून घेऊयात किंमत-
नव्या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या विशेषतेबद्दल सांगायचे झाल्यास, या Jio प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत कॉलिंग, डेटा आणि OTT स्ट्रीमिंगचे लाभ मिळतील. तसेच, या प्लॅन्समुळे तुमच्या खिशावरही जास्त ताण येणार नाही. हे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 329 रुपये, 949 रुपये आणि 1049 रुपयांच्या किंमतीत ऑफर करण्यात आले आहे.
Jio च्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा उपलब्ध आहे.
याशिवाय प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100SMS देखील मिळतात. OTT स्ट्रीमिंग सुविधेबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये JioTV, JioCloud आणि JioCinema सोबत Jio Saavn Pro चे ऍक्सेस मिळेल.
हा प्लॅन तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसहा येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाचा लाभही दिला जात आहे.प्लॅनमध्ये 5G वेलकम ऑफर देखील दिली जात आहे, याचा अर्थ तुम्हाला त्यामध्ये अनलिमिटेड 5G इंटरनेटचा देखील प्रवेश मिळेल. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या JIO रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 90 दिवसांसाठी Disney+Hotstar सबस्क्रिप्शन मिळेल.
वरील प्लॅनप्रमाणे, Jio च्या 1,049 रुपयांच्या प्लॅनची वैधता देखील 84 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटाचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G इंटरनेटचाही लाभ मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह 100SMS चा लाभ देखील दिला जातो. या प्लॅनमधील उपलब्ध OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला SonyLIV आणि ZEE5 मध्ये ऍक्सेस मिळेल. तसेच, या प्लॅनसोबत, तुम्हाला JIoTV मोबाईल ॲपचा ॲक्सेस देखील दिला जात आहे.