Jio New Plans: कंपनीने लाँच केले दोन नवीन प्रीपेड प्लॅन्स! मिळेल तब्बल 164GB मोबाईल डेटा, OTT बेनिफिट्स उपलब्ध
रिलायन्स Jio ने लोहरीच्या निमित्ताने दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.
नव्या प्लॅनची किंमत 749 रुपये आणि 1029 रुपये इतकी आहे.
या प्लॅनमध्ये प्रसिद्ध OTT प्लॅटफार्म Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने लोहरीच्या निमित्ताने दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग, मोफत SMS आणि दैनंदिन डेटासह अनेक फायदे उपलब्ध आहेत. Jio ने नवे प्रीपेड प्लॅन दीर्घ वैधतेसह सादर केले आहेत. वापरकर्त्यांना या प्लॅनसह दीर्घ वैधता आणि दैनिक डेटा देखील मिळणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात नव्या Jio प्लॅन्सची किंमत आणि बेनिफिट्स-
Jio New Plans
वर सांगितल्याप्रमाणे, Jio ने दोन नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची किंमत 749 रुपये आणि 1029 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे दोन्ही प्लॅन दैनंदिन डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS सह येतात. एवढेच नाही तर, यापैकी एका प्लॅनमध्ये Jio आपल्या यूजर्सना OTT चे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. कार्यालयीन कामकाज घरून करणाऱ्या आणि ऑनलाईन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना खूप उपयुक्त ठरतील.
Jio चा 749 रुपयांचा प्लॅन
नव्या Jio च्या 749 रुपयांच्या प्लॅनमध्ये अप्रतिम बेनिफिट्स उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. तर, 20GB अतिरिक्त डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत तुम्हाला दररोज 100SMS देखील मिळतात. हा प्लॅन 72 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमधील इतर बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात JioCinema, JioTV आणि JioCloud वर ऍक्सेस उपलब्ध आहे.
Jio चा 1029 रुपयांचा प्लॅन
Jio कंपनीच्या 1,049 रुपयांच्या इतर नवीन प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2GB डेटा मिळतो. तसेच, प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा मिळेल. एवढेच नाही तर, या प्लॅनमध्ये प्रसिद्ध OTT प्लॅटफार्म Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. तसेच, या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. याशिवाय, या फोनमधेय इतर Jio ऍप्सचे ऍक्सेस देखील मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio चे वरील दोन्ही प्लॅन्स अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहेत, ज्यांना अधिक डेटासह दीर्घ वैधता मिळेल. तसेच, या दोन्ही प्लॅनमध्ये यूजर्सना दीर्घ वैधता देखील मिळणार आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile