Jio New OTT Plans: Jio कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 3 नवे प्लॅन्स लाँच केले आहेत. विशेष म्हणजे नवे प्लॅन्स OTT सबस्क्रिप्शन बेनिफिट्ससह येतील. म्हणजेच कॉलिंग आणि डेटा व्यतिरिक्त हे प्लॅन तुमच्या मनोरंजनाची देखील विशेष काळजी घेतील. दरवाढीच्या फटक्यानंतर आपल्या नव्या प्लॅनद्वारे कंपनी युजर्सना दिला देण्याचे प्रयत्न करत आहे. नव्या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney+Hotstar, SonyLIV आणि ZEE5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Jio च्या नव्या OTT प्लॅन्सची किंमत-
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, कंपनीने आपल्या प्रीपेड प्लॅन पोर्टफोलिओमध्ये 3 नवीन प्लॅन्सचा समावेश केला आहे. Jio च्या नव्या प्लॅन्सची किंमत 329 रुपये, 949 रुपये आणि 1049 रुपये इतकी आहे. पहा बेनिफिट्स-
Jio च्या 329 रुपयांच्या प्लॅन 28 दिवसांची वैधता प्रदान करतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटाचा ॲक्सेस मिळेल. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100SMS ची सुविधा देखील मिळणार आहे. OTT बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन तुम्हाला JioSaavn Pro चा ऍक्सेस मिळेल.
Jio च्या 949 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन तुम्हाला अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा देतो. तसेच, यात तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 2GB डेटाची सुविधाही मिळेल. एवढेच नाही तर, तुम्हाला दररोज 100SMS मिळतील. OTT बेनिफिटमध्ये, तुम्हाला 90 दिवसांसाठी Disney+Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन प्रदान करतो. एवढेच नाही तर, हा प्लॅन 5G वेलकम ऑफरसह येतो.
Jio च्या 1049 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे. वरील प्लॅनप्रमाणे, हा प्लॅन देखील 5G वेलकम ऑफरसह देखील येतो. त्याबरोबरच, तुम्हाला 100SMS देखील मिळतील. OTT बेनिफिट्समध्ये Jio चा हा प्लॅन तुम्हाला JioTV मोबाइल ॲप अंतर्गत SonyLIV आणि ZEE5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे.