Jio ने आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओमध्ये एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. नव्या प्लॅनची किंमत 857 रुपये आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना दीर्घ वैधतेसह डेटा, कॉलिंग आणि OTT सारखे बेनिफिट्स ऑफर करतो. जर तुम्ही देखील JIO चे ग्राहक असाल आणि दीर्घ वैधता, डेटा, कॉलिंग आणि OTT फायद्यांसह सुसज्ज प्लॅन शोधत असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतो. कंपनीने 857 रुपयांचा नवा प्लॅन सादर केला आहे. चला तर मग Jio च्या नवीन प्लॅनशी संबंधित सर्व तपशील बघुयात-
JIO च्या 857 रुपयांच्या प्लॅनची वैधता 84 दिवसांपर्यंत आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Jio च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 2GB डेटाची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण वैधतेदरम्यान दररोज 2GB डेटा मिळेल. 84 दिवसांच्या वैधतेनुसार तुम्हाला या प्लॅनमध्ये 168GB डेटाचा ऍक्सेस मिळेल. दैनंदिन डेटा कोटा संपल्यानंतर इंटरनेटचा वेग 64 Kbps पर्यंत कमी होतो.
त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील उपलब्ध आहे. वापरकर्ते 84 दिवस कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. त्याबरोबरच, यामध्ये दररोज 100SMS देखील मिळतील.
विशेष म्हणजे या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनाचीही पूर्ण सोय करण्यात आली आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्स Amazon Prime Video Mobile Edition चे मोफत सबस्क्रिप्शनचा लाभ घेऊ शकतात. हे सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांसाठी पूर्ण 84 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. याव्यतिरिक्त, JioTV, JioCinema आणि JioCloud सुविधांही मिळतील. तसेच, Jio ग्राहकांना या प्लॅनसह 5G वेलकम ऑफर देखील मिळेल.
Jio ने नुकतेच आपल्या JioBharat युजर्ससाठी एक अप्रतिम मिड-बजेट प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना जवळपास दोन महिन्यांची म्हणजेच 56 दिवसांची वैधता दिली जाते. युजरला दररोज 500MB डेटा मिळतो. तसेच, अमर्यादित कॉलिंग आणि 300SMS ची सुविधा मिळेल. यामध्ये वापरकर्त्यांना JioSaavn आणि JioCinema चे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.