Jio New Data Plans: नव्या प्लॅन्समध्ये मिळेल तब्बल 50GB पर्यंत डेटा, किंमत 49 रुपयांपासून सुरु

Updated on 25-Sep-2024
HIGHLIGHTS

Jio ने 5 नवे डेटा ऍड ऑन प्लॅन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये लाँच केले.

Jio च्या नव्या डेटा पॅक्सची किंमत 49 रुपयांपासून सुरु

Jio चा 359 रुपयांचा प्लॅन हा या यादीतील सर्वात महागडा डेटा ॲड-ऑन प्लॅन आहे.

Jio New Data Plans: भारतातील आघाडीचे टेलिकॉम दिग्गज Jio चे प्रीपेड प्लॅन दैनंदिन डेटा सुविधेसह येतात. त्याबरोबरच, वापरकर्त्यांना या प्लॅन्समध्ये इतर अनेक फायदे देखील मिळतात. आपणा सर्वांना माहितीच आहे की, घरून ऑफिसचे काम करणाऱ्या आणि ऑनलाइन अभ्यास करणाऱ्या वापरकर्त्यांना जास्त प्रमाणात मोबाइल डेटाची आवश्यकता असते.

अशा परिस्थितीत, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये विशेष डेटा प्लॅन्स देखील उपलब्ध आहेत. यामध्ये कंपनीने आणखी काही प्लॅन्स समाविष्ट केले आहेत. वापरकर्त्यांना या पॅकमध्ये दीर्घ वैधतेसह डेटा मिळतो. Jio च्या नव्या डेटा पॅक्सची किंमत 49 रुपयांपासून सुरु होते. प्लॅन्स खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.

Jio New Data Plans

49 रुपयांचा प्लॅन

Jio च्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 1 दिवसासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. होय, या प्लॅनमध्ये 25GB हाय-स्पीड डेटा देण्यात आला आहे. यानंतर मोबाईल डेटाचा स्पीड 64kbps इतका आहे.

175 रुपयांचा प्लॅन

या Jio च्या 175 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 10GB डेटा दिला जातो. या प्लॅनची ​​वैधता देखील 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये युजरच्या मनोरंजनाची सोय देखील करण्यात आली आहे. होय, डेटा व्यतिरिक्त Jio चा या प्लॅनमध्ये Sony LIV, Zee5 आणि JioCinema Premium चे ऍक्सेस मिळेल. वापरकर्त्यांना यात 10 पेक्षा जास्त OTT चे सबस्क्रिप्शन मिळेल.

219 रुपयांचा प्लॅन

219 रुपयांच्या Jio डेटा ॲड-ऑन पॅकमध्ये 30GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनची ​​वैधता एक पूर्ण महिना म्हणजेच 30 दिवस आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणतीही सुविधा मिळणार नाही.

289 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 289 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 40GB डेटा ऑफर केला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनची ​​वैधता संपूर्ण एक महिन्याची म्हणजेच 30 दिवसांची आहे.

359 रुपयांचा प्लॅन

Jio चा 359 रुपयांचा प्लॅन हा या यादीतील सर्वात महागडा डेटा ॲड-ऑन प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना तब्बल 50GB डेटा मिळत आहे. या प्लॅनची ​​वैधता देखील वरील प्लॅनप्रमाणे 30 दिवस म्हणजे एका महिन्याची आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :