रिलायन्स जिओकडे अनेक स्वस्त आणि जोरदार फायदेशीर ब्रॉडबँड प्लॅन्स आहेत. जिओने नुकतेच 'नया इंडिया का नया जोश' या टॅगलाइनसह हे प्लॅन सादर केले आहेत. हे प्लॅन 399 रुपये, 699 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपये आहेत. JioFiber च्या या नवीन प्लॅन्समध्ये यूजर्सला अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. या पोस्टपेड ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅनची खासियत झिरो अपफ्रंट कॉस्ट असेल, म्हणजेच कंपनी कोणतेही इन्स्टॉलेशन चार्ज किंवा सिक्युरिटी डिपॉझिट आकारणार नाही. चला आम्ही तुम्हाला Jio Fiber च्या या खास प्लान्सबद्दल सांगतो, ज्याबद्दल क्वचितच लोकांना माहिती आहे…
Jio Fiber च्या 399 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये कंपनी 30Mbps स्पीडवर अनलिमिटेड इंटरनेट देत आहे. याशिवाय या प्लॅनच्या वापरकर्त्यांना देशभरात अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंगचा लाभही मिळणार आहे.
हा Jio Fiber चा सिल्व्हर प्लॅन आहे. यामध्ये 100Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट डेटा मिळेल. याशिवाय, 399 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे, कंपनी देशभरात अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग सर्व्हिस देखील देत आहे.
हे सुद्धा वाचा : 4K OLED डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह HP चे नवीन लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमत
हा Jio Fiber चा गोल्ड प्लॅन आहे. यामध्ये 150Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये देशभरात अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय, कंपनी या प्लॅनसह दरमहा 1,000 रुपये दरातील 11 OTT ऍप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.
हा Jio Fiber चा डायमंड प्लान आहे. यामध्ये ग्राहकांना 300Mbps च्या स्पीडने अमर्यादित इंटरनेट मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉईस कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. 1499 रुपयांच्या या प्लॅनसह, कंपनी 1500 रुपये प्रति महिना दरातील 12 OTT ऍप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देखील देत आहे.