Jio New Plan: कंपनीने लाँच केला Unlimited 5G डेटा आणि कॉलिंगसह नवा प्लॅन, जाणून घ्या किंमत

Updated on 19-Jul-2024
HIGHLIGHTS

रिलायन्स Jio च्या नवीन प्लॅनची किंमत 999 रुपये आहे.

Jio चा नवा रिचार्ज प्लॅन Hero 5G टॅगसह सादर करण्यात आला आहे.

Jio च्या नवीनतम प्लॅनची वैधता तीन महिन्यांहून अधिक आहे.

Jio युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. होय, कंपनीने आपल्या यूजर्ससाठी नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा रिचार्ज प्लॅन Hero 5G टॅगसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 90 दिवसांपेक्षा जास्त वैधता ऑफर केली जाणार आहे. एवढेच नाही तर, या प्लॅनच्या आगमनाने Airtel आणि Vodafone Idea सारख्या कंपन्यांना टेलिकॉम मार्केटमध्ये जोरदार स्पर्धेला सामोरे जावे लागेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेउयात नव्या Jio प्लॅनची किमत-

दीर्घकालीन वैधतेसह Jio चा नवा प्लॅन

Jio च्या नवीन प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जाणार आहे. एवढेच नाही तर, वर सांगितल्याप्रमाणे या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G डेटा दिला जात आहे. इतर महत्त्वाच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 100SMS उपलब्ध आहेत. यामध्ये इतर नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे.

इतर बेनिफिट्सबद्दल बोलयचे झल्यास, या रिचार्ज प्लॅनमध्ये Jio tv, Cinema आणि Cloud चा ॲक्सेस मोफत दिला जात आहे. या प्लॅनची वैधता तीन महिन्यांहून अधिक म्हणेजच संपूर्ण 98 दिवसांची आहे. Jio वापरकर्ते रिलायन्स jio च्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपवरून नवीन प्रीपेड प्लॅन रिचार्ज करू शकतात.

अलीकडेच लाँच केले स्वस्त प्लॅन्स

Jio ने अलीकडेच 3 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 51 रुपये, 101 रुपये आणि 151 रुपये इतकी आहे. या तिन्हींमध्ये अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला जातो. एवढेच नाही तर, या नव्या तिन्ही प्लॅन्ससोबतच अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हे तिन्ही डेटा पॅक्स तुमच्या ऍक्टिव्ह बेस प्लॅनसह रिचार्ज करता येतील.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :