Jio ने 909 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे.
नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर केला जातो.
युजरच्या मनोरंजनासाठी तुम्हाला एक नव्हे तर दोन लोकप्रिय OTT सब्स्क्रिप्शनचा लाभ
Jio सध्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवनवीन प्लॅन्स लाँच करत आहे.अधिकाधिक युजर्सला आकर्षित करण्यासाठी Jio ने नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा ऑफर केला जातो. एवढेच नाही तर, प्लॅनमध्ये दोन लोकप्रिय OTT Apps चे सबस्क्रिप्शनही मोफत उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या आकर्षक प्लॅन्सबद्दल माहिती बघुयात-
Jio चा 909 रुपयांचा प्लॅन
होय, Jio ने 909 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या दीर्घकालीन वैधतेसह येतो. या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा म्हणजेच एकूण 168GB डेटा मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला इंटरनेट डेटा संपण्याची कोणतीही चिंता नसेल. त्याबरोबरच, प्लेन टेक्स्ट करण्यसाठी यात 100SMS देखील उपलब्ध आहेत. तसेच, अमर्यादित कॉलिंग सुद्धा दिले जात आहे, ज्यामुळे वापरकर्ते तासनतास कोणत्याही नेटवर्कवर बोलू शकतात.
विशेष म्हणजे युजरच्या मनोरंजनासाठी तुम्हाला एक नव्हे तर दोन OTT सब्स्क्रिप्शनचा लाभ दिला जात आहे. होय, प्लॅनमध्ये तुम्हाला SonyLIV आणि Zee5 चे सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. वर सांगितल्याप्रमाणे, हा प्लॅन अमर्यादित 5G डेटासह येतो. तुम्ही MyJio App च्या 2GB डेली डेटाच्या सेक्शनमध्ये जाऊन या प्लॅनचा रिचार्ज सहज करू शकता.
नुकतेच लाँच झालेला Jio प्लॅन
कंपनीने सप्टेंबरमध्ये Jio AirFiber सेवा सुरू केली आहे. लक्षात घ्या की, ही कंपनीची 5G FWA म्हणजेच फिक्स्ड-वायरलेस एक्सेस सर्व्हिस आहे. लाँच दरम्यान कंपनीने या सेवेअंतर्गत 6 नवीन प्लॅन्स सादर करण्यात आले होते. त्यानंतर, आता कंपनीने Jio AirFiber सर्व्हिस अंतर्गत आणखी एक स्वस्त प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत फक्त 401 रुपये आहे. या प्लॅनची संपूर्ण माहित आणि बेनिफिट्स जाणून घेण्यसाठी येथे क्लिक करा.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.