Jio ने लाँच केला दीर्घकालीन प्लॅन! हाय-स्पीड डेटासह Amazon Prime Video सबस्क्रिप्शन उपलब्ध
Jio च्या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत 3,227 रुपये आहे.
या नवीन रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.
या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.
Jio ने या महिन्याच्या सुरुवातीला तीन दीर्घकालीन प्रीपेड योजना लॉन्च केल्या होत्या. 3,225 रुपये, 3,226 रुपये आणि 3662 रुपये असे हे प्लॅन आहेत. या सिरीजमध्ये टेलिकॉम कंपनीने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन वार्षिक प्रीपेड प्लॅन्स सादर केला आहे. या नवीन रिचार्ज पॅकमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल. तसेच, प्लॅनमध्ये OTT बेनिफिट देखील मिळतो. हा डेटा प्लान अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे.
Jio चा 3,227 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन
Jio च्या नवीन प्रीपेड प्लॅनची किंमत 3,227 रुपये आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटासह, दररोज 2GB डेटा आणि 100SMS दिला जात आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, रिचार्ज प्लॅनसह Amazon प्राइम सब्सक्रिप्शन आणि Jio TV, Cinema आणि Cloud चा ऍक्सेस देखील दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवस म्हणजे एक वर्ष आहे.
Jioचा हा प्रीपेड प्लॅन अधिकृत वेबसाइट, पेटीएम आणि Gpay सारख्या प्लॅटफॉर्मवरून रिचार्ज केला जाऊ शकतो.
या महिन्याच्या सुरुवातीला लाँच झालेले प्लॅन्स
रिलायन्स जिओने क्रिकेट वर्ल्ड काप डोळ्यासमोर ठेवून 6 नवीन प्रीपेड प्लॅन्स लाँच केले. या प्रीपेड प्लॅनची सुरुवातीची किंमत 328 रुपये आहे. या सर्व प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100SMS दिले जात आहेत. तसेच, पुरेसा डेटा उपलब्ध आहे. याशिवाय, Disney+ Hotstar चे सदस्यत्व क्रिकेट पॅकमध्ये मोफत मिळेल.
Jio AirFiber 599 रुपयांचा प्लॅन
जिओने सप्टेंबरमध्ये भारतात Jio AirFiber लाँच केले होते. ही सेवा सध्या 8 शहरांमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 599 रुपयांपासून सुरू होते. या प्लॅन्समध्ये 30Mbps च्या स्पीडने डेटा दिला जात आहे. यामध्ये कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, योजना 14 OTT Apps मध्ये प्रवेश आणि डिजिटल चॅनेलसाठी समर्थन प्रदान करते. जिओची ही सेवा एअरटेलला जोरदार टक्कर देईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile