Reliance Jio ने भारतात नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. हा एक परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे, जो JioBharat 4G फीचर फोनसाठी ऑफर केला जातो. Jio चा नवीन प्लॅन 234 रुपयांचा आहे. कंपनीने हा प्लॅन दीर्घकालीन वैधतेसह लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा कॉलिंगसह अनेक बेनिफिट्स मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नव्या प्लॅनचे बेनिफिट्स-
JioBharat च्या 234 रुपयांच्या प्लॅनला मिड-बजेट प्लॅन म्हटले जात आहे. कारण याआधी JioBharat फीचर फोनसाठी 123 आणि 1234 रुपयांचे दोन रिचार्ज प्लॅन ऑफर केले जात आहेत. 234 रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, JioBharat च्या या प्लॅनमध्ये एकूण 28GB डेटा देण्यात आला आहे. म्हणजेच दररोज 500MB डेटा दिला जाईल. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय 300SMS ची सुविधा 28 दिवसांसाठी उपलब्ध आहे. हा रिचार्ज प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना JioSaavn आणि JioCinema चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.
JioBharat चा 123 रुपयांचा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये एकूण 14GB डेटा ऍक्सेससह येतो. यामध्ये 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि SMS ची सुविधा दररोज 500MB डेटासह उपलब्ध आहे. तसेच, JioSaavn आणि JioCinema चे सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे.
JioBharat चा Rs 1,234 प्लॅन हा वार्षिक प्लॅन आहे, जो 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज 500MB डेटानुसार 168GB डेटा मिळतो. हा प्लान 28 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि SMS सुविधेसह येतो. या प्लॅनमध्ये JioSaavn आणि JioSaavn चे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.