Jio Down: भारतातील बहुतांश वापरकर्त्यांसाठी जिओ डाउन, डाउन डिटेक्टर दर्शवतोय मोठ्या प्रमाणात वाढ 

Jio Down: भारतातील बहुतांश वापरकर्त्यांसाठी जिओ डाउन, डाउन डिटेक्टर दर्शवतोय मोठ्या प्रमाणात वाढ 
HIGHLIGHTS

आज बरेच लोक Jio नेटवर्कमध्ये समस्या असून ते स्लो आणि बंद झाल्याबद्दल तक्रार करत आहेत.

17 सप्टेंबर 2024 रोजी सुमारे 10,372 Jio वापरकर्त्यांनी सुमारे 12.40 वाजता नेटवर्क त्रुटी नोंदवल्या.

'#Jiodown' X म्हणजेच आधीच्या Twitter वर देखील ट्रेंड करत आहे.

Jio भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम प्रदात्यांपैकी एक आहे. भारतातील बहुतांश लोक Jio चे नेटवर्क वापरतात. या नेटवर्कवर अनेकांचे काम सुरु असते. मात्र, आज बरेच लोक Jio नेटवर्कमध्ये समस्या असून ते स्लो आणि बंद झाल्याबद्दल तक्रार करत आहेत. एवढेच नाही तर, डाउन डिटेक्टरने जिओ नेटवर्क डाउन होत असल्याच्या अहवालात मोठी वाढ दर्शवली आहे.

प्रसिद्ध वेबसाईट ‘डाउन डिटेक्टर’ यासारख्या गोष्टींचा मागोवा ठेवणारी वेबसाइट, 17 सप्टेंबर 2024 रोजी सुमारे 10,372 Jio वापरकर्त्यांनी सुमारे 12.40 वाजता नेटवर्क त्रुटी नोंदवल्या. त्यांच्या डेटानुसार 68% पेक्षा जास्त Jio वापरकर्त्यांनी ‘नो सिग्नल’ 18% नोंदवले. वापरकर्त्यांपैकी मोबाइल इंटरनेट समस्या आणि 14% लोकांना जिओ फायबरमध्ये समस्या येत असल्याचे, सांगितले गेले आहे.

Jio Rs 448 vs Rs 449 plans compared which offers better value

Jio चा वापरकर्ता आधार लक्षात घेऊन याचा बऱ्याच भारतीयांवर परिणाम होत असल्याने, #Jiodown X म्हणजेच आधीच्या Twitter वर देखील ट्रेंड करत आहे.

#Jiodown ट्रेंड

Jio चा वापरकर्ता आधार लक्षात घेऊन याचा बऱ्याच भारतीयांवर परिणाम होत असल्याने, #Jiodown X म्हणजेच आधीच्या Twitter वर देखील ट्रेंड करत आहे. X वरील पोस्टनुसार, जिओचे सर्व्हर सध्या IDC मध्ये आग लागल्याने डाऊन आहेत, जे त्याचे डेटा सेंटर आहे, असे अहवालातून पुढे आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या घटनेमुळे X वर एक मेम फेस्ट देखील सुरू झाला आहे.

jio 175rs ott plan

होय, अनेक वापरकर्त्यांनी मुकेश अंबानींना टॅग केले आणि समस्या लवकरात लवकर सोडवण्याची विनंती केली आहे. शिवाय, जे जिओ फायबर सेवा वापरतात ते देखील आउटेजमुळे वैतागले आहेत.

आम्ही तुम्हाला सांगतो की, Jio सोबत अशी समस्या पहिल्यांदाच घडलेली नाही. अलीकडेच म्हणजेच जूनमध्येही जिओ वापरकर्त्यांना अशा समस्येचा सामना करावा लागला होता. युजर्सना इंटरनेट वापरता येत नव्हते, यामुळे असा गदारोळ त्यावेळीही पाहायला मिळाला होता. इंटरनेटच्या अशा समस्यांमुळे युजर्सना सोशल मीडियाचे वापर देखील करता येत नव्हते. Jio ने अद्याप आउटेजला अधिकृतपणे संबोधित केले नाही, परंतु कंपनीकडून लवकरच याची अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo