सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये Jio सर्वात महाग रिचार्ज प्लॅन ऑफर करते.
भारतात उपलब्ध सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 4,498 रुपये आहे.
या प्लॅनसह तुम्हाला एका वर्षासाठी OTT सब्स्क्रिप्शन देखील देण्यात येणार आहे.
रिलायन्स Jio च्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. Jio स्वस्त ते महाड्या किंमत श्रेणीमध्ये अनेक प्रीपेड प्लॅन्स ऑफर करते. पण तुम्हाला माहिती आहे का? की भारतात सध्या असलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांमध्ये Jio सर्वात महाग रिचार्ज प्लॅन ऑफर करते. भारतात उपलब्ध सर्वात महागड्या रिचार्ज प्लॅनची किंमत 4,498 रुपये आहे. जाणून घेऊयात महागड्या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणकोणते खास बेनिफिट्स मिळतात.
4,498 रुपयांचा Jio प्लॅन
रिलायन्स Jio या प्लॅनची वैधता 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका वर्षाची आहे. या प्लॅनमधील उपलब्ध असलेल्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये 2GB डेटा दररोज देण्यात येतो. एवढेच नाही तर, तुम्हाला हा डेटा 5G स्पीडसह मिळणार आहे. यानुसार, संपूर्ण वैधतेदरम्यान ग्राहकांना एकूण 730GB 5G डेटा मिळेल. एवढेच नाही तर, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100SMS देखील दिले जातात.
लक्षात घ्या की, या प्लॅनसह तुम्हाला OTT सब्स्क्रिप्शन देखील देण्यात येणार आहे. यामध्ये 14 OTT Apps चे सबस्क्रिप्शन ऑफर केले आहे. यामध्ये Disney Plus Hotstar, SonyLIV, G5, JioCinema, Prime Video यासह एकूण 14 Apps चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर केले जाईल.
सविस्तर बोलायचे झाल्यास, प्लॅनमध्ये लोकप्रिय Disney+ Hotstar चे 1 वर्षासाठी मोबाइल सबस्क्रिप्शन दिले जाईल. तर, Prime Video मोबाइल एडिशन 1 वर्षासाठी आणि JioCinema प्रीमियम मेंबरशिप 1 वर्षासाठी ऑफर केली जात आहे. Jio चा 4,498 रुपयांचा प्लॅन एक कस्टमर प्रायोरिटी प्लॅन आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.