भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स Jio ने नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन कंपनीने 200 रुपयांपेक्षा कमी किमतीत अमर्यादित 5G डेटासह सादर केला आहे. लक्षात घ्या की, 5G अमर्यादित डेटासह हा Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेडच नाही तर सोबतच यूजर्सना रोजचा डेटादेखील मिळणार आहे. जाणून घेऊयात नव्या प्लॅनची किंमत आणि सर्व बेनिफिट्स-
Jio च्या नवीन प्लॅनची किंमत 198 रुपये इतकी आहे. बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा देण्यात आली आहे. त्याबरोबरच, दररोज 100SMS देखील मोफत उपलब्ध आहेत. तर, वर सांगितल्याप्रमाणे, या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मिळतो.
या प्लॅनमध्ये युजर्सच्या मनोरंजनाची सोय देखील करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला JioCinema, JioCloud इत्यादी अनेक Jio ॲप्सचे मोफत ऍक्सेस देखील उपलब्ध आहे. या अप्रतिम बेनिफिट्ससह हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन कमी वैधता असलेल्या वापरकर्त्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. MyJio ॲपच्या मदतीने वापरकर्ते हा नवीन प्लॅन रिचार्ज करू शकतात.
लक्षात घ्या की, 28 दिवसांच्या वैधतेसह कंपनीच्या अमर्यादित 5G डेटा प्लॅनची किंमत 349 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनची वैधता देखील नवीन प्लॅनपेक्षा अर्ध्या दिवसांची आहे. जर आपण Jio ची प्रतिस्पर्धी Airtel बद्दल बोललो तर, कंपनीचा सर्वात स्वस्त 5G अनलिमिटेड प्लॅन 379 रुपये आहे. हा प्लॅन Jio पेक्षा थोडा जास्त महाग आहे.