Jio Plan: 40GB मोफत 5G डेटासह 3 नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच! जाणून घ्या किंमत

Jio Plan: 40GB मोफत 5G डेटासह 3 नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच! जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Reliance Jio कडून क्रिकेट लव्हरसाठी तीन प्रीपेड प्लॅन जाहीर

Jio कंपनी 40GB पर्यंत डेटा मोफत देत आहे जाणून घ्या किंमत

Jio नव्या प्लॅन्समध्ये दररोज 3GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसारखे लाभ मिळतील

Reliance Jio Plan: रिलायन्स  जिओ ने युजर्ससाठी उत्तम ऑफर्ससह नवीन प्लॅन्स लाँच केले आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी तीन नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लाँच केले. दूरसंचार दिग्गज लोकांना डेटा संपण्याची चिंता न करता IPL सामने पाहण्यासाठी 40GB पर्यंत मोफत डेटा ऑफर करत आहे. IPL 2023 हे प्लॅन्स लाँच करण्यात आले आहेत. यासह, Jioने वापरकर्त्यांसाठी तीन नवीन डेटा ऍड-ऑन पॅक देखील जाहीर केले आहेत.

जिओ फ्री डेटा व्हाउचर:

जिओ क्रिकेट प्लॅन सर्वाधिक डेटा ऑफरसह येतात. अतिरिक्त मोफत डेटा व्हाउचरसह 3GB दिवस अखंड स्ट्रीमिंग अनुभव मिळवण्यासाठी ही ऑफर सुरू केली आहे. Jio ने 40GB पर्यंत मोफत डेटासह 3 नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. Jio च्या 999 रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंग फायदे मिळतात. याशिवाय, Jio वापरकर्त्यांना 241 रुपयांचे मोफत व्हाउचर मिळेल, ज्यात 40GB डेटा असेल. नवीन पॅक 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.

लेटेस्ट जियो प्लॅन 

यासह, Jio च्या 219 रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो. प्लॅनसोबत 14 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि 25 रुपयांचे फ्री व्हाउचर देखील उपलब्ध असतील. वापरकर्ते प्लॅनसह उपलब्ध असलेल्या मोफत व्हाउचरमधून 2GB अतिरिक्त डेटा देखील घेऊ शकतील. तसेच, 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला संपूर्ण 28 दिवस अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्येही दररोज 3GB डेटाचा लाभ मिळतो. प्लॅनसह तुम्हाला 61 रुपयांचे मोफत व्हाउचर मिळेल, जे तुम्हाला 6GB डेटा जोडण्याची परवानगी देईल.

Jio क्रिकेट डेटा ऍड-ऑन प्लॅन

Jioने या तीन प्लॅनसह तीन नवीन ऍड-ऑन प्लॅन्सही लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये 50 GB, 100 GB आणि 150 GB पर्यंत अतिरिक्त डेटा उपलब्ध आहे. सर्वात स्वस्त क्रिकेट डेटा ऍड-ऑन प्लॅनची किंमत 222 रुपये आहे. या प्लॅनमध्ये 50 जीबी डेटा ऍड-ऑन करता येतो. Jio च्या 444 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 60 दिवसांची वैधता आणि 100 GB डेटा मिळेल. तर, 667 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांची वैधता आणि 150GB डेटा उपलब्ध असेल

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo