देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स JIOने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी रु. 349 आणि रु 899 चे दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्रीपेड प्लॅन्समध्ये ग्राहकांना अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसारख्या सुविधा मिळणार आहेत. कंपनीने दोन्ही प्लॅन आपल्या MyJio ऍप, अधिकृत वेबसाइट आणि इतर रिचार्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले आहेत. अलीकडेच रिलायन्स JIO ने 61 रुपये किंमतीचा 5G प्लॅन सादर केला आहे. जाणून घेऊयात नवीन प्लॅन्सबद्दल सर्वकाही…
हे सुद्धा वाचा : 108MP कॅमेरा आणि दमदार फीचर्ससह येईल OnePlus Nord CE 3 फोन, वाचा लीक्स…
रिलायन्स JIOने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीनुसार, 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी दररोज 2.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 SMS दररोज मिळतात. वापरकर्त्यांना JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity मध्ये मोफत प्रवेश मिळेल. यासह, वैध ग्राहकांना अमर्यादित 5G कव्हरेज देखील मिळेल.
रिलायन्स JIO च्या या प्लॅनमध्ये तीन महिन्यांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटाही मिळतो. 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity सारख्या Jio ऍप्समध्ये प्रवेश देखील प्लॅनसह विनामूल्य उपलब्ध आहे. या प्लॅनसह, कंपनी वैध वापरकर्त्यांना हाय स्पीड इंटरनेट सेवा 5G मध्ये प्रवेश देखील देत आहे.
Jio च्या या 5G अपग्रेड प्लॅनमध्ये 6 GB हाय-स्पीड डेटा उपलब्ध असेल. या व्यतिरिक्त, या प्लॅनची कोणतीही वैधता नसेल म्हणजेच त्याची वैधता ही तुमच्या विद्यमान योजनेची वैधता असेल. Jio ची 61 रुपयांची Jio वेलकम ऑफर रु. 119, रु. 149, रु. 179, रु. 199 आणि रु. 209 च्या प्लॅन्सवर काम करते.