दिवाळीनिमित्त Jio चा मोठा धमाका! Unlimited कॉलिंग आणि डेटासह फूड डिलिव्हरी सब्स्क्रिप्शन Free, युजर्सची मज्जाच मजा
दिवाळीनिमित्त रिलायन्स Jio ने एक मोठा धमाका केला आहे.
रिलायन्स Jio ने 866 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.
हा प्लॅन नियमित बेनिफिट्सशिवाय Swiggy One Lite Subscription सह येतो.
दिवाळीनिमित्त रिलायन्स Jio ने एक मोठा धमाका केला आहे. होय, Jio ने ग्राहकांसाठी एक अनोखा प्लॅन सादर केला आहे. खरं तर, रिलायन्स Jio ने 866 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे, जो फूड डिलिव्हरी सबस्क्रिप्शनसह सुसज्ज आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. या नव्या प्लॅनमुले Jio युजर्सची मज्जाच मजा असणार आहे.
खरं तर, एखाद्या कंपनीने कोणत्याही प्लॅनसोबत फूड डिलिव्हरीचा पर्याय देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Swiggy One Lite चे सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी 99 रुपये किमतीत खरेदी केले जाऊ शकते. वाचा सविस्तर-
रिलायन्स Jioचा 866 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स Jio च्या 866 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या नेहमीच्या बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा आहे. एव्हढेच नाही, तर तुम्ही 5G पात्र ग्राहक असाल तर तुमच्यासाठी प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा देखील दिला जातो. या प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे. जवळपास तीन महिने तुम्हाला या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
त्याबरोबरच, या प्लॅनमध्ये Jio ऍप्सचा ऍक्सेस देखील मिळेल. आता मुद्द्यावर येत असताना आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लॅनचे सर्वात खास बेनिफिट्स म्हणजे ‘Swiggy One Lite Subscription’ होय. चला तर मग जाऊन घेऊयात या सबस्क्रिप्शनसह तुम्हाला कोणते विशेष लाभ मिळतील.
Swiggy One Lite Subscription
स्विगी वन लाइट सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पुढीलप्रमाणे लाभ दिले जाणार आहेत.
- 149 रुपये किमतीच्या 10 ऑर्डरवर मोफत होम डिलिव्हरी दिली जाईल.
- 199 रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या 10 ऑर्डरवर Instamart वर मोफत डिलिव्हरी देखील दिली जात आहे.
- या सब्स्क्रिप्शनसह, तुमच्याकडून खाद्यपदार्थ आणि Instamart वर वाढीव शुल्क आकारले जाणार नाही.
- नियमित ऑफर व्यतिरिक्त, तुम्हाला तब्बल 20K+ रेस्टॉरंटमधून फूड डिलिव्हरीवर सुमारे 30% अतिरिक्त सूट मिळेल.
- तुम्हाला 60 रुपयांपेक्षा जास्त Genie Delivery वर 10% सूट दिली जाणार आहे.
थांबा थांबा ! हे बेनिफिट्स इतक्यातच संपत नाही. ‘पिक्चर अभी बाकी है।’ फेस्टिव्ह सीझन अंतर्गत, ग्राहकांना कंपनीकडून 866 रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यास सुमारे 50 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळेल. हा कॅशबॅक तुमच्या MyJio अकाउंटमध्ये जमा केला जाईल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile