क्रिकेट लव्हर्सना Jio ने दिले मोठे गिफ्ट! Free Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह 6 नवे प्लॅन्स लाँच। Tech News 

क्रिकेट लव्हर्सना Jio ने दिले मोठे गिफ्ट! Free Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह 6 नवे प्लॅन्स लाँच। Tech News 
HIGHLIGHTS

क्रिकेट लव्हर्ससाठी JIO ने लाँच केले तब्बल 6 नवीन प्लॅन्स

ICC क्रिकेट विश्वचषक सामन्याचे थेट प्रसारण Disney+ Hotstar OTT प्लॅटफॉर्मवर केले जात आहे.

Jio चे हे सहा नवीन प्लॅन्स Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शनसह येतात.

Jio कंपनीने ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी आपल्या रिचार्ज प्लॅन पोर्टफोलिओमध्ये तब्बल 6 नवीन प्लॅन्स लॉन्च केले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, ICC क्रिकेट विश्वचषक सामन्याचे थेट प्रसारण Disney+ Hotstar OTT प्लॅटफॉर्मवर केले जात आहे. Jio चे हे सहा नवीन प्लॅन विशेषत: क्रिकेट चाहत्यांसाठी सादर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये वापरकर्त्यांना Disney + Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

जर तुमच्याकडे Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन नसेल, पण तुम्ही Jio चे ग्राहक असाल तर कंपनीने तुमच्यासाठी आकर्षक गिफ्ट आणले आहे. कंपनीने विविध श्रेणींमध्ये आपले नवे 6 प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 328 रुपयांपासून सुरू होते.

Jio New Prepaid Plans with Disney+ Hotstar
Jio New Prepaid Plans with Disney+ Hotstar

Jio चा 328 रुपयांचा प्लॅन

Jio चा 328 रुपयांचा नवीन प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1.5GB डेटा दिला जात आहे. त्याबरोबरच प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात. दूरसंचार फायद्यांव्यतिरिक्त, हा प्लॅन 3 महिन्यांपर्यंत मोफत Disney+ Hotstar मोबाइल सब्स्क्रिप्शनसह येतो.

Jio चा 388 रुपयांचा प्लॅन

Jio चा 388 रुपयांचा नवीन प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा मिळेल. वरील प्लॅनप्रमाणे यात देखील तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. याशिवाय 3 महिन्यांपर्यंत मोफत Disney + Hotstar मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.

Jio चा 598 रुपयांचा प्लॅन

Jio चा 598 रुपयांचा प्लॅनमध्ये देखील 28 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS समाविष्ट आहेत. मात्र, या प्लॅनसह तुम्हाला 1 वर्षाचे Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

hotstar
DISNEY+HOTSTAR

Jioचा 758 रुपयांचा प्लॅन

Jio चा 758 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 1.5GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात. याशिवाय 3 महिन्यांसाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनही मोफत आहे.

Jio चा 808 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतील. OTT बेनिफिट्समध्ये 3 महिन्यांसाठी Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनही मोफत आहे. जिओचा 808 रुपयांचा प्लान 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.

Jio चा 3,178 रुपयांचा प्लॅन

फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMSची सुविधा आहे. OTT बेनिफिट्समध्ये 1 वर्षासाठी Disney + Hotstar लाभ देखील देते. जिओच्या 3,178 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 365 दिवस म्हणजे संपूर्ण एका वर्षाची आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo