Jio: नवीन International Roaming Pack लाँच, सुरुवातीची किमंत केवळ 121 रुपये

Jio:  नवीन International Roaming Pack लाँच, सुरुवातीची किमंत केवळ 121 रुपये
HIGHLIGHTS

Jio कडून नवीन इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅक सादर

कंपनीने हे प्लॅन 5 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये लाँच केले आहेत.

Travel Pass, Roam More Packs, Global Packs, IR Data-Only Packs और International Wi-Fi Calling या श्रेणींचा समावेश

टेलिकॉम दिग्गज रिलायन्स Jio ने आपल्या यूजर्ससाठी नवीन इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅक सादर केले आहेत. कंपनीने हे प्लॅन 5 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये लाँच केले आहेत. Travel Pass, Roam More Packs, Global Packs, IR Data-Only Packs और International Wi-Fi Calling या श्रेणींचा यात समावेश आहे. चला तर मग या प्लॅनची ​​किंमत आणि बेनिफिट्स जाणून घेऊयात. 

Travel Pass

JIOचा IR ट्रॅव्हल पास 32 देशांमध्ये उपलब्ध असेल. कंपनीच्या या पासमध्ये 3 प्लॅन समाविष्ट केले आहेत. 

499 रुपयांचा प्लॅन 

 हा प्लॅन 1 दिवसाच्या वैधतेसह सादर करण्यात आला आहे. या पासमध्ये, वापरकर्त्यांना 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 100 SMS आणि 250MB डेटा मिळतो. या पाससह इनकमिंग कॉल पूर्णपणे विनामूल्य आहेत, परंतु यासाठी तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर Wi-Fi कॉलिंग ऑप्शन सुरु करावा लागेल. डेटा लिमिट संपल्यानंतर स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होणार आहे.

2,499 रुपयांचा प्लॅन 

हा प्लॅन 10 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनचे फायदे 499 प्लॅन सारखेच आहेत. यामध्येही 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 100 SMS आणि 250MB डेटाचा अ‍ॅक्सेस उपलब्ध आहे. 

4,999 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनची वैधता 30 दिवसांपर्यंत आहे. या प्लॅनमध्ये 150 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 1500 SMS आणि 5GB डेटा उपलब्ध आहे. यामध्ये सुद्धा मोफत इनकमिंग कॉलसाठी Wi-Fi कॉलिंग पर्याय सक्षम करावा लागेल.

Jio Global Packs

हा पॅक 130 हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये दोन प्लॅन्स समाविष्ट आहेत. 

1101 रुपयांचा प्लॅन 

या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे. हा प्लॅन वाय-फाय कॉलिंगसह येतो. या प्लॅनमध्ये, तुम्हाला रु. 933.05 चा मूल्य वापर मिळतो. तसेच यामध्ये तुम्ही 5 SMS करू शकता. 

 1102 रुपयांचा प्लॅन 

हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो, यात देखील वाय-फाय कॉलिंगसह येतो. हा प्लॅन 933.90 रुपयांची युसेज व्हॅल्यू ऑफर करतो, ज्यामध्ये वाय-फाय कॉलिंगच्या 1 मिनिटासाठी 1 रुपये आकारले जातील.

Jio Roam More Packs

जिओ रोम मोअर पॅकमध्ये 3 प्लॅन्सचा समावेश आहे, जे 44 देशांमध्ये उपलब्ध असतील.

1,499 रुपयांचा प्लॅन

हा प्लॅन 14 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये आउटगोइंग आणि इनकमिंग कॉलिंगसाठी 150 मिनिटे उपलब्ध आहेत. याशिवाय, प्लॅनमध्ये 1GB हाय-स्पीड डेटा आणि 100 SMS समाविष्ट आहेत. डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी होईल. 

3,999 रुपयांचा प्लॅन

 प्लॅन आउटगोइंगसाठी 250 मिनिटे ऑफर करतो, तर वाय-फाय कॉलिंग चालू असताना इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत असतील. प्लॅनमध्ये 4GB हाय-स्पीड डेटा आणि 100SMS समाविष्ट आहेत. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. 

5,999 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. यात आउटगोइंगसाठी 400 मिनिटे उपलब्ध आहेत, तर Wi-Fi कॉलिंग चालू असताना इनकमिंग कॉल पूर्णपणे मोफत असतील. याशिवाय, प्लॅनमध्ये 6GB हाय-स्पीड डेटा आणि 500 ​​SMS समाविष्ट आहेत. 

IR-Data Only Packs

IR-Data Only Packs 32 देशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तीन प्लॅन्सचा समावेश आहे. 

2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. याशिवाय, यात 5GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळतो.

4499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता आहे, ज्यामध्ये तुम्हाला 8GB डेटाचा प्रवेश मिळेल. 

तर, 5,899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 21 दिवसांच्या वैधतेसह 10GB डेटा मिळतो.

Wi-Fi calling IR Pack

कंपनीने IR Wi-Fi कॉलिंग IR पॅकमध्ये दोन प्लॅन सादर केले आहेत. 

 121 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 मिनिटे इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल उपलब्ध आहेत, ज्यासाठी वाय-फाय कॉलिंग पर्याय चालू ठेवावा लागेल. यात 2 दिवसांची वैधता आहे.

तर, 521 रुपयांचा दुसरा प्लॅन आहे. या प्लॅनची ​​वैधता 10 दिवसांची आहे, ज्यामध्ये कॉलिंगसाठी 500 मिनिटे उपलब्ध आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo